शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेवरून केलं बेताल वक्तव्य

शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेवरून केलं बेताल वक्तव्य

Sanjay Gaikwad on Badlapur incident : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुनः एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संजय गायकवाड यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर बोलताना बेताल विधान केलं आहे. (Badlapur) मुख्यमंत्री काय आता शाळेत पहारा देणार का? असं विधान आमदार गायकवाड यांनी केलं आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेचा SIT कडून प्राथमिक रिपोर्ट सादर; धक्कादायक माहिती आली समोर

कारवाई होणार का?

या विधानाने नागरिकांमध्ये संताप आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आमदारांवर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. संजय गायकवाड यांची वाचाळ वक्तव्यं हे नवं नाही. ते यापूर्वी देखील अनेक वेळा वादग्रस्त विधानं करत चर्चेत राहिले आहेत. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत की, अशा आमदारांवर कारवाई का केली जात नाही?

संजय गायकवाड काय म्हणाले?

कालच्या बदलापूर प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. संजय गायकवाड यांनी विरोधकांच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, काल आंदोलन पाहील सर्व पक्ष त्याच्यावर थयथयाट करत होते. ही एक प्रवृत्ती असते त्यांना मुलीचं वय देखील कळत नाही. ते अत्याचार करतात. आता सर्व विरोधक सरकार सरकार करत आहेत. आता मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? पोलीस निरीक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत का? की आरोपी फोन करुन सांगतात की ये चल ये मी बलात्कार करत आहे, असं सांगतात का ते?

Badlapur : गुन्हा लपवण्याचा यंत्रणेकडून प्रयत्न; बदलापूर घटनेवरुन राहुल गांधींचे टीकास्त्र

नागरिकांमध्ये संताप

या विधानांमुळे संजय गायकवाड यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याला ‘असंवेदनशील’ असं म्हटले आहे. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर आणि आमदारांच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यातील नागरिक आणि विरोधकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि सरकारकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube