Pune Crime : गांजासह इतर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे १६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्वारगेट (Swargate) येथील एस.टी. स्टँड परिसरात करण्यात आली.
Pune Metro च्या दुसऱ्या टप्प्यासाठी 3626 कोटींची मंजूरी, अजितदादांनी मानले मोदींचे आभार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून आलेल्या तीन इसमांकडे गांजासह इतर अमली पदार्थ असून ते पुण्यात विक्रीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती अंमलदारांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून इस्माल शेख (वय २८), नावेद शेख (वय २३) आणि नवनाथ शिंदे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार (MH-09-EJ-3323) असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जप्त मुद्देमालाची तपशीलवार माहिती:
६ किलो गांजा — अंदाजे किंमत ₹१२,००,०००
इनोव्हा क्रिस्टा वाहन — अंदाजे किंमत ₹३,५०,०००
२ मोबाईल फोन — अंदाजे किंमत ₹९५,६००
या कारवाईत पोलीस निरीक्षक शीतल राजाने, सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठाकूर, फिरोज शेख, सुजय पवार, नवनाथ शिंदे यांच्यासह स्वारगेट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
Pune Metro च्या दुसऱ्या टप्प्यासाठी 3626 कोटींची मंजूरी, अजितदादांनी मानले मोदींचे आभार
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, अपर पोलीस आयुक्त शीतल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ही कारवाई अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची ठोस आणि प्रभावी कामगिरी ठरली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.