Pune District Collector Suhas Diwase transfer : पुण्यातून एक मोठी बातमी समोर (Pune News) आलीय. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करण्यात आलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आलीय. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे आता पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार (Pune Collecter) आहे. जितेंद्र डूडी कनिष्ठ अधिकारी असल्यामुळे पद अवनत करून त्यांच्याकडे पुणे जिल्हाधिकारी पदाचा भार सोपवण्यात आलाय.
काही महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी IAS पुजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Pune Collector Suhas Diwase) यांच्या विरोधात लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधित लैंगिक छळ झाला, असं पुजा खेडकरने सांगितलं होतं. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे चर्चेत आले होते. त्यांची बदली करण्यात आलीय. डॉ. सुहास दिवसे यांच्याजागी जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी आहेत. सुहास दिवसे यांची अवघ्या अकरा महिन्यांतच बदली करण्यात आलीय.
Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी; आता सर्वोच्च ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर…
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या मागण्यांबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase News) यांनी उच्च स्तरावर तक्रार केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पूजा खेडकरवर कारवाईचा बडगा उचलला होता. तिची वाशिम येथील सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर बदली केली होती.
कोण आहेत सुहास दिवसे?
सुहास दिवसे हे 2009 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत. महाराष्ट्रात त्यांनी अनेक उच्च पदांवर काम केलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांपूर्वी ते कृषी आयुक्त आणि नंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही होते.
काय होता वाद?
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्याकडे व्हीआयपी सुविधांची मागणी केली होती. खेडकर यांनी दिवाकडे गाडी, बंगला आणि कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती. दिवसे यांनी 24 जून रोजी केलेल्या तक्रारीत खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राहण्याबाबत कथित दबावाचा उल्लेख केला होता.