Pune Divorce News : अनेकदा आपण नवरा-बायकोंची भांडणे ऐकलीत, भांडणानंतर दोघांमध्ये अखेर घटस्फोट होतो. मात्र, घटस्फोटादरम्यान (Pune Divorce News) पती-पत्नीचा मुलांमध्ये जीव अडकत असतो, पण पुण्यातील एका प्रकरणामध्ये पतीचा मुलांमध्ये नाहीतर पत्नीला भेट दिलेल्या आफ्रिकन पोपटात (Affrican Parrot) जीव अडकल्याचं पाहायला मिळालं आहे. या पतीने घटस्फोटादरम्यान, चक्क गिफ्ट दिलेल्या आफ्रिकन पोपटाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे न्यायालयात घटस्फोटासाठी केस दाखल असताना आधी पोपट दे मगच घटस्फोट घे, असं पतीकडून पत्नीला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या अजब केसची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे.
‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पंकज त्रिपाठींनी साकारली वाजपेयींची हुबेहूब व्यक्तिरेखा
नेमकं प्रकरण काय?
काही वर्षांपूर्वी दोघेही लग्न बंधनात अडकले होते. दोघांचाही संसार सुरळीत सुरु होता. काही वर्षांनंतर दोघांमध्ये वादाची मालिका सुरु झाली. हा कौटुंबिक वाद अखेर न्यायालयाच्या पायरीवर येऊन ठेपला. पत्नीला पतीकडून घटस्फोट घेण्याची इच्छा होती. अखेर पत्नीने वकील भाग्यश्री गुजर यांच्यामार्फत न्यायालयात केस फाईल केली.
‘त्या’ विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार! भाजप आमदारांची मागणी अन् लोढांकडून पूर्तता
सुरुवातीला हे प्रकरण समुपदेशन करुन मिटेल, असा अंदाज असल्याने न्यायालाने प्रकरण समुपदेशनासाठी वर्ग केलं. मात्र, अनेक प्रयत्नानंतरही पत्नी-पती घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठामच राहिले. पर्यायी घटस्फोटाची केस पुन्हा न्यायालयात वर्ग झाली. न्यायालयात ही केस सुरु असतानाच पत्नीकडून घटस्फोटासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
रेल्वे विभागात 3000 हून पदांसाठी भरती सुरू, १० वी पास, आयटी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज
मात्र, पतीचा जीव त्याने गिफ्ट म्हणून दिलेल्या आफ्रिकन पोपटामध्ये अडकला होता. पतीने पत्नीकडे मागणी केली की मला आफ्रिकन पोपट परत दे तेव्हाच मी तूला घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं. मात्र, पत्नीला हे मान्य नव्हते. असाच संपूर्ण प्रकार मागील तीन वर्षांपासून सुरुच होता. अखेर पत्नीचं समुपदेशन केल्यानंतर पत्नीने पतीपुढे गुडघे टेकवले. तिने आफ्रिकन पोपट परत देण्याचं कबूल केलं.
दरम्यान, पत्नीने पतीला आफ्रिकन पोपट दिल्यानंतर मागील तीन वर्षांपासून सुरु असलेला नवरा-बायकोचा वाद मिटला आणि दोघांमध्ये अखेर घटस्फोटही झाला. या घटना समोर येताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोणाचा जीव पत्नीत, तर कोणाचा मुलांमध्ये पण या घटनेत एका पक्ष्यामध्ये पतीचा जीव अडकल्याचीच चर्चा सध्या सुरु आहे.