Ganeshostav Pune : राज्यभरात गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयार सुरु आहे. पुण्यातही गणशोत्सवासाठी (Ganeshostav Pune) जोरदार तयारी सुरु आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेश मंडळांकडून भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलायं. तर एकूण 7 हजार पोलिसांचा फौजफाटा पुण्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलीयं.
पुण्यात एकूण 3798 सार्वजनिक गणेश मंडळं असून गणेशोत्सव काळात पोलिस बंदोबस्तासाठी एकूण 7 हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. यामध्ये 4 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 23 सहाय्यक आयुक्त, 128 पोलिस निरीक्षक, 568 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 4604 अंमलदार, 1100 होमगार्ड, तर एसआरपीएफच्या 10 तुकड्या तैनात असणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कुमार यांनी दिलीयं.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकूण 1742 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलीयं. या काळात पेट्रोल, डिझेलसारख्या ज्वालाग्रही पदार्थांचा देखाव्यासाठी उपयोग करण्यास मनाई करण्यात आलीयं. तसेच साऊंडच्या आवाजावर मर्यादा ठेवण्यात आलीयं, नियमांचं पालन न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी पोलिस आयुक्त कुमार यांनी दिलायं. गणेशोत्सव काळात 12 सप्टेंबरपासून 17 सप्टेंबरपर्यंत सकाळी 6 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत साऊंड स्पीकरला परवानगी देण्यात आली असून या काळात फटाके वाजवण्यास मनाई करण्यात आलीयं.
एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का?, एका वाक्यात देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून अनेक रस्ते अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेल्या रस्त्यांऐवजी पर्यायी रस्त्यावरुन वाहतुकीचा पर्याय देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात शिवाजी रोड, गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौकापर्यंतची वाहतूक बंद करण्यात आलीयं.
कोणते रस्ते खुले? :
गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे
शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक
झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवेस जाणाऱ्या वाहन चालकांनी खुडे चौकातून मनपा पुणे समोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रिमियर गॅरेज चौक शिवाजी पुल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक.
सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत
फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
मंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस
वाहने लावण्याची व्यवस्था :
न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा चौक दरम्यान एका बाजुला वाहने लावण्यास परवानगी
वीर संताजी घोरपडे पथावरील महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौकदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने लावण्यास परवानगी
टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावण्या परवानगी
मंडईतील मिनर्व्हा आणि आर्यन वाहनतळ येथे वाहने लावता येतील
शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावण्याची परवानगी