पुण्यातील गॅंगवॉर थांबेना : आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपविले

Pune Gang War Murder आयुषच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेवर कोंढव्यात गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे.

पुण्यातील गॅंगवॉर थांबेना : आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपविले

पुण्यातील गॅंगवॉर थांबेना : आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपविले

Pune Gang War Murder : आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपविल्याचा प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतील टोळीयुद्धात 19 वर्षीय आयुष कोमकरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. त्यानंतर आता आयुषच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेवर कोंढव्यात गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आम्हाला त्याचा अंदाज कधी आला नाही; आयुष कोमकर हत्येबाबात आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?

कोण होता गणेश काळे? 

गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्या प्रकरणात आरोपी आहे. दत्ता काळेवर आयुष हत्या प्रकरणात शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. तर, पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार करण्यात आला त्यात गणेश काळेचा मृत्यू झाला. गणेशवर आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या तसेच त्याच्यावर कोयत्यानेदेखील वार करण्यात आले ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. कोंढव्यातील खडी मशीन चौकात दिवसाढवळ्या अशाप्रकारे खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णानेच दिलं पिस्तूल, मोबाइल फोडला अन् ; मारेकऱ्यांची कबुली

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला काय घडलं होतं?

पुण्यातील नाना पेठेत कोमकर कुटुंब वास्तव्यास आहे. 5 सप्टेंबर 2025 ला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आयुष त्याचा लहान भाऊ अर्णवला क्लासमधून घेऊन आला. इमारतीच्या बेसमेंटमध्ये दोघे आले. आयुष गाडी पार्क करत होता. नेमक्या याच वेळी त्याच्यावर पाळत ठेऊन असलेले दोघे समोर आले. त्यांनी आयुषवर तब्बल 12 राउंड फायर केले. यातील 9 गोळ्या आयुषला लागल्या आणि तो तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर गोळीबार करणारे दोघे जण फरार झाले. या घटनेने पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा चव्हाट्यावर आले. Pune Gang War Murder

खूनाचा बदला खून! आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून आंदेकर टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. वनराज आंदेकरांचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगकडून काही केलं जाऊ शकतं याची शक्यता होती म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र आंदेकरच्या टोळीने गणेश कोमकरचा मुलगा टार्गेट केल्याने गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

Exit mobile version