Download App

पुणेकरांनो सावध व्हा! अतिवृष्टीचा इशारा, धरणातून पाणी सोडण्यापूर्वी 2 तास आधी भोंग्याद्वारे अलर्ट

Pune Rain Warning Alert Siren 2 hours before water Released From Dam : राज्यात नुकतंच मान्सूनचं आगमन झालंय. पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणेकरांना (Pune Rain) धरणातून पाणी सोडण्यापूर्वी दोन तास अगोदर भोंगा वाजवून अलर्ट दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा (Heavy Rain) सतर्क झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता पावसाच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आलीय. नागरिकांना धरणातून विसर्ग करताना दोन तास अगोदर सूचना मिळणार आहेत. पुण्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग (Maharashtra Rain) करण्याचा इशारा दिला जाणार आहे. तर पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी यंत्रणा भोंग्याच्या स्वरूपात कायमस्वरुपी बसवावी. नागरिकांना त्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सिकल सेल ॲनिमिया 22 वर्षांत होणार हद्दपार, केंद्र सरकारची घोषणा; जाणून घ्या, आजाराचं गांभीर्य..

यंदा मान्सून लवकर आला असून पुणे जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थितीमध्ये नदीमध्ये धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर कोणकोणत्या भागांवर परिणाम होऊ शकतो, याची माहिती जलसंपदा विभागाकडून महापालिकेला देण्यात आली आहे.

मागील वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले होते. त्यामुळे सिंहगड रोडवर पूर आला होता. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासन वेळेवर सूचना आणि पायाभूत सुविधांच्या तयारीवर भर देत आहे. यादृष्टीने प्रशासनाने तयारी देखील सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलसंपदा विभागाला धरणातून पाणी सोडण्याच्या किमान दोन तास आधी सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. कारण नागरी संस्था आणि आपत्कालीन यंत्रणेकडून वेळेत मदत पुरवली जाईल.

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून आरोपीचा एन्काऊंटर; नक्की काय घडलं?

हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला पुढील काही दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः डोंगरी आणि नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केलं गेलं आहे.

 

follow us