Download App

पुणे हादरले ! हॉटेलमध्ये बसलेल्या एकाला संपविले; पिस्तुलातून बेछूट गोळीबार

  • Written By: Last Updated:

one killed in indapur-pune: पुणेः पुणे शहर (Pune) व जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. इंदापूर (Indapur) शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला एकाला पाच ते सहा जणांनी संपविले आहे. दोघांनी सुरुवातीला दोन पिस्तूलमधून गोळीबार केला. तर त्यानंतर पाठीमागून आलेल्या पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार केला आहे. अविनाश धनवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इंदापूर बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. पुणे(Pune Police) ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.

प्रकाश आंबेडकराचं ‘मविआ’सोबत पक्कं होणार, राहुल गांधींना दिलं जेवणाचं आमंत्रण

या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण मागील वादाच्या कारणातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. या हत्येचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही समोर आले आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश धनवे हा त्याच्या तीन मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला होता. त्यावेळी हॉटेलमध्ये दोघे आले. त्यातील एकाचा हातात प्लॅस्टिकची पिशवी होती. दोघांनी पिस्तूल काढून थेट धनवेच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. भीतीने त्याचे तीनही मित्र बाजूला पळाले.

Loksabha Election : भाजपने बारामती मनावर घेतले : चंद्रकांतदादांनी साऱ्या नेत्यांना बोलावलं

त्यानंतर आणखी पाच सहा जण बाहेरून आले. त्यांच्या हातात कोयत्यासारखे शस्त्र होते. त्यांनी सर्वांनी जखमी धनवेवर वार करण्यास सुरुवात केली. अनेक वार केल्यानंतर धनवेचा मृत्यू झाल्याचे सर्वांनी पाहिले. त्यानंतर सर्व अज्ञात आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

follow us