Harshwardhan Patil यांना इंदापूरमध्ये फिरू न देण्याची धमकी? पत्र लिहित घेतली शिंदे-फडणवीसांकडे धाव
Harshwardhan Patil : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( Harshwardhan Patil ) यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटल आहे. सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांचा वाद शिगेला गेला आहे. त्यामुळे इंदापुरात देखील हा वाद पेटलेला आहे. यासाठी आता पाटील यांनी फडणवीस आणि शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
‘पैसे दे काम करतो’; NHAI च्या बड्या अधिकाऱ्यांसह 6 जण अटकेत, CBI कारवाई
मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यमहाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे… pic.twitter.com/aXfWNW1ZOr
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) March 4, 2024
या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी लिहिले आहे की, ते राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने काम करत आहे. पण माझ्या तालुक्यामध्ये मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.
ठाकरेंना खुश करण्यासाठी आरोप, हे बदनाम आम्हाला करण्याचं षडयंत्र; शिंदे गटाने सरोदेंचे आरोप फेटाळले
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
महाराष्ट्र राज्यमहाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर… pic.twitter.com/GkPWDRPo42
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) March 4, 2024
तसेच मला तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देखील दिली जात आहे. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत असून ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्यात यावी. त्यात आपण तात्काळ लक्ष घालावं आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा. याबाबत आपण ठोस भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अशी विनंती या पत्राद्वारे हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या स्थानिक वादांमुळे महायुतीमध्ये ठीक ठिकाणी ठिणगी पडत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये हर्षवर्षण पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे , विजय शिवतारे विरुद्ध राष्ट्रवादी , राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांचा समावेश आहे. दरम्यान याच प्रकारचे वाद मिटवण्यासाठी मुंबईमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी तालुकास्तरावर समन्वय ठेवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिले आहेत तसेच एकदिलाने काम करा असे देखील सांगण्यात आले.