‘पैसे दे काम करतो’; NHAI च्या बड्या अधिकाऱ्यांसह 6 जण अटकेत, CBI ची कारवाई

‘पैसे दे काम करतो’; NHAI च्या बड्या अधिकाऱ्यांसह 6 जण अटकेत, CBI ची कारवाई

CBI : राज्यात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपूरसह भोपाळमध्ये सीबीआयने (CBI) राष्ट्रीय प्राधिकरणाच्या खाजगी कंपनीच्या 2 संचालकांसह 6 जणांना 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या घरातून सीबीआयने लाचेच्या रक्कमेसह एकूण सव्वा कोटी रुपये जप्त केले आहेत.

मोठी बातमी : खासदार, आमदारांची खैर नाही; लाच घेऊन मतदान अन् भाषण करणाऱ्यांवर चालणार खटला

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र खाजगी कंपनीकडून वेळेवर काम पूर्ण करण्यात आलं नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकर आणि प्रकल्पाचे व्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे बिल मंजुरीसाठी सादर केले होते. कंपनीने उर्वरित काम पूर्ण केले आणि बिलाची रक्कम मंजूर करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेतली.

तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम का झालं नाही? कोल्हेंचा अजितदादांना बोचरा सवाल

त्यांनी लवकरच बिल मंजूर करून पैसे खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले. गेल्या दोन महिन्यांपासून बिल मंजूर होत नसल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने काळे यांची पुन्हा भेट घेतली आणि बिल मंजूर करण्याबाबत विचारणा केली. अरविंद काळे यांनी प्रकल्पाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यालयातील 11 कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्विकारली
रस्त्याच्या प्रकल्पांची बिले रखडलेली होती. त्याबाबत पूर्णत्वाचं प्रमाणपत्र आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्विकारली असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात लाच स्विकारणारे आरोप शासकीय अधिकारी असून ते उच्चपदस्थ आहेत. त्यापैकी एक नागपुरात प्रकल्प संचालक अरविंद काळे तर दुसरा आरोपी ब्रिजेश कुमार साहू मध्यप्रदेशातील हरदा इथं उपमहाव्यवस्थापक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube