Download App

पुण्याच्या शाळेची जागतिक भरारी! जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेला ‘वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राईस’

Pune Jalindar Nagar ZP School या शाळेला World’s Best School Prize – Community Choice Award 2025 हा पुरस्कार मिळाला आहे.

Pune Jalindar Nagar ZP School got Worlds Best School Prize Community Choice Award 2025 : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. असं आपण नेहमी म्हणतो. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कारण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेचं नावं जागतिक पातळीवर झळकलं आहे. या शाळेला World’s Best School Prize – Community Choice Award 2025 हा पुरस्कार मिळाला आहे.

Bandu Andekar House : पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; बंडू आंदेकरच्या घरावर ‘बुलडोझर’ कारवाई

हा पुरस्कार T4 Education (UK) या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. जगातील सर्वोत्तम शाळांसाठी हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो.  हा केवळ जागतिक सन्मान नसून भारतातील सर्व शासकीय शाळांसाठी एक प्रेरणा आहे. या शाळेवर संदीप म्हसुडगे हे मुख्याध्यापक आणि दत्तात्रय वारे हे शिक्षक आहेत. त्यांच्या कामगिरीने ही शाळा आज जागतिक स्तरावर पोहचली आहे.

US Shutdown : अमेरिकेत शटडाऊनला सुरूवात; कामकाज बंद, शटडाऊन म्हणजे काय? परिणाम काय?

ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. यामध्ये जालिंदरनगरच्या शाळेला लोकसहभागातूीन शाळा विकास या विभागात सहभाग घेतला होता. त्यात त्यांची जगातील लाखो शाळांमधून World’s Best School Prize – Community Choice Award 2025 या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही घोषणा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. तर या शाळेला आता 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 15 नोव्हेंबरला अबुधाबी येथे होणार आहे.

या शाळेची खासियत काय?

या शाळेने सहअध्ययन मॉडेल राबवले. त्यामध्ये त्यांनी मोठ्यालहान वयाच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थ्यांना कोडींग, प्रोग्रामिग, रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसराख्या विषयांचे शिक्षण. बहुभाषिक शिक्षण, गणिताच्या प्रगत पद्धतीने विज्ञान विषयांमध्ये गतिशीलता यावर भर दिला जातो. इलेक्ट्रॉनिक्स, सुतारकाम, प्लंबिंगचे ज्ञान देण्यासाठी तज्ज्ञ पालकांचा सहभाग. शाळेने पारंपारिक शिक्षण पद्धतींपेक्षा वेगळे विचार करून अध्यापनावर प्रयोग केले. शाळेच्या भौतिक बाबींसाठी लोकसहभाग, सीएसआरची मदत आणि प्रशासनाचा पाठिंबा मिळाला

follow us