Download App

Pune : जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात, कंटेनरच्या धडकेत दोघे जागीच ठार, 5 जण गंभीर

  • Written By: Last Updated:

Pune Accident: अपघातांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, अपघातांना आळा घालण्यात हवं तश यश मिळत नाही. दररोज अपघाताच्या बातम्या समोर येतात. आताही पुण्यातील कात्रज येथील जांभूळवाडी दरी पुलावर (Jambhulwadi Dari Bridge) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन-चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Telangana elections : कॉंग्रेसने आंबेडकरांचा दोनदा पराभव केला हे विसरू नका; केसीआर यांचं टीकास्त्र 

मिळालेल्या माहितीनुार, पुणे-बंगळुर मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी तीव्र वळण आहे. याच दरी पुलावर शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने 4 ते 5 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की चारही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कंटेनर भररस्त्यात उलटला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

BMC Workers : हायकोर्टाचं बीएमसीच्या ‘त्या’ सफाई कामगारांना मोठं दिवाळी गिफ्ट; 25 वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चार ते पाच वाहणांना जोरदार धडक दिली. त्यामुळं हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला ऐन दिवाळीत कंटेनरच्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघात मृत्यू आणि जखमी झालेल्यांची नावं कळू शकलेली नाहीत. पुलावरच झालेल्या या अपघातामुळं रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच वाहतूक सुरळीत केली.

 

Tags

follow us