केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या गाडीला भीषण अपघात, शिक्षकाचा मृत्यू

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या गाडीला भीषण अपघात, शिक्षकाचा मृत्यू

Prahlad Patel Car Accident : मध्य प्रदेशमध्ये (MP Election 2023) सध्य विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे छिंदवाड्यात आले होते. यावेळी कार्यक्रम आटोपून जात असताना अपघाताची घटना घडली. (Prahlad Patel) हे अपघातात जखमी झाले आहेत. छिंदवाडाहून नरसिंगपूरला येत असताना अमरवाडाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या मोटारसायकलस्वारांना त्यांचे वाहन धडकले, अशी माहिती मिळत आहे. या अपघातात अन्य चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रल्हाद पटेल किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

शिक्षकाचा मृत्यू
या अपघातात मोटारसायकल चालवणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी जमावाने केंद्रीय मंत्री पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

अनेक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार निरंजन चंद्रवंशी यांचा मृत्यू झाला. भुला मोहगाव येथील रहिवासी निरंजन चंद्रवंशी हे उच्च माध्यमिक शिक्षक आहेत. त्याची पत्नी गृहिणी असल्याचे सांगितले जाते. या अपघातात निखिल निरंजन (7 वर्षे), संस्कार निरंजन (10 वर्षे) आणि जतीन बसंत चंद्रवंशी (17 वर्षे) हे जखमी झाले. या भीषण अपघातात केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचे एपीएस आदित्य हेही जखमी झाले आहेत.

बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा थेट 75 टक्क्यांवर; नितीशकुमार यांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल छिंदवाडाहून नरसिंगपूरला परतत होते. छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील सिंगोडी बायपासजवळ हा अपघात झाला. मृत व्यक्ती शाळेतून घरी परतत असताना चुकीच्या बाजूने दुचाकीने धडक दिली. अपघातात प्रल्हाद पटेल यांचे वाहनही रस्त्यावरून जाऊन शेतात गेले. कारच्या एअरबॅग उघडल्यानंतर प्रल्हाद पटेल थोडक्यात बचावले. कारमध्ये प्रवास करणाऱ्या इतर लोकांनाही कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube