बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा थेट 75 टक्क्यांवर; नितीशकुमार यांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक
पाटना : बिहारमधील (Bihar) आरक्षणाची मर्यादा आता थेट 75 टक्क्यांवर जाणार आहे. याबाबतच प्रस्ताव आज (7 नोव्हेंबर) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी विधानसभेत सादर केला. जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीवरुन हा प्रस्ताव मांडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. मात्र या अधिवेशनातच हा बदल अंमलात आणायचा आहे. असा इरादा त्यांनी बोलून दाखविला. (Chief Minister Nitish Kumar presented the proposal to increase the limit of reservation in Bihar in the Legislative Assembly)
दरम्यान, आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेत आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी जातनिहाय जनगणनेनंतर नितीशकुमार यांनी आणखी एक मास्टरस्ट्रोक मारला असल्याची बिहारच्या राजकारणात चर्चा आहे.
जातनिहाय जनगणनेचा सविस्तर अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. यावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मांडला. नितीशकुमार म्हणाले, बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती 50 टक्वे आहे. या प्रस्तावानुसार ही मर्यादा 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. केंद्र सरकारचे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (EWS) असलेले 10 टक्के आरक्षण धरुन एकूण 75 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे, असे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : ऐन दिवाळीत फटाक्यांवर बंदी; महाराष्ट्रात काय होणार?
या प्रस्तावानुसार आरक्षणाची व्याप्ती कशी वाढणार?
– सध्या SC साठी 16 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के केले जाणार
– एसटी 1 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत वाढवणार
– EBC (अत्यंत मागास) आणि OBC यांना मिळून 43 टक्के आरक्षण दिले जाणार.
बिहारमध्ये कोणती जात आणि किती टक्के?
बिहारमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, बिहारची एकूण लोकसंख्या 13 कोटींहून अधिक आहे. राज्यात मागासवर्गीयांची संख्या 27.13%, अत्यंत मागासवर्गीय 36.01%, सामान्य वर्ग 15.52% असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या ही अत्यंत मागासवर्गीयांची आहे. लोकसंख्येनुसार अत्यंत मागासवर्ग 36.01 टक्के असून त्यांची संख्या 4,70,80,514 आहे. तर मागासवर्गीय 27.12 टक्के असून त्यांची संख्या 3,54,63,936 आहे.
अनुसूचित जाती 19.6518 % असून त्यांची लोकसंख्या 2,56,89,820 आहे तर, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 21,99,361 आहे जी एकूण लोकसंख्येच्या 1.6824 % आहे. अनारक्षित म्हणजेच सर्वसाधारण जातीची लोकसंख्या 2 कोटी 2 लाख 91 हजार 679 आहे जी बिहारच्या एकूण लोकसंख्येच्या 15.5224 टक्के आहे.
Bihar Cast Survey : ‘फक्त 7 टक्के ‘ग्रॅज्यूएट’, 25 टक्के सवर्ण गरीब’; बिहारची आकडेवारी धक्कादायक
बिहारमधील जातींची टक्केवारी किती?
जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात नितीश सरकारने एकूण 215 जातींची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमधील जातनिहाय लोकसंख्या मुस्लिम- 17.70 टक्के, यादव- 14. 26 टक्के, कुर्मी – 2.87 टक्के, कुशवाह- 4.21 टक्के, ब्राह्मण- 3.65 टक्के, भूमिहार- 2.86 टक्के, राजपूत- 3.45 टक्के, मुशार- 3.08 टक्के, मल्लाह- 2.60 टक्के, व्यापारी –2.31 टक्के, कायस्थ – 0.60 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.