Download App

विरोधी पक्षात राहून जास्त कामं मार्गी लागत नाहीत; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : महाराष्ट्रामध्ये प्रश्न अनेक आहेत, विरोधी पक्षात राहून जास्त काही कामं मार्गी लागत नाहीत. मी 30 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये विरोधी तसेच सत्ताधारी पक्षात काम केले. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, अशी आम्हाला शिकवण आहे. त्यामध्ये शाहु, फुलेंच्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमावेळी बोलत होते.(Pune jejuri ajit pawar says Being in the opposition party does not get much done ekantnath shinde devendra fadnavis )

Letsupp Special : अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का?

देशाचा विकास होत असताना, महाराष्ट्राच्या विकासाची गाडी भरधाव वेगाने धावणार असल्याचे पवार म्हणाले. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीच कमतरता आपल्याला भासणार नाही, 80 हजार कोटींची कामं एकट्या महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या मदतीनं सुरु असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; अंबादास दानवे अन् संदिपान भुमरे भिडले

परंतु आज आपण जर पाहिलं तर एकेकाळी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. त्यांच्याकडं पाहून देश पुढे चालत होता, करिश्मा होता, त्यांच्या नंतर राजीव गांधींचा करिश्मा होता, त्यानंतर अटबिहारी वाजपेयी यांचं राज्य होतं, त्यानंतर मनमोहन सिंग यांचं नेतृत्व होते, आणि आता गेली नऊ वर्ष विकासाचं मोठं व्हिजन असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर चाललेला आहे.

हे सरकार राज्याचा विकास करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना योग्य पद्धतीची मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची असेल असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

Tags

follow us