Big Breaking : पुणे शहरात पुन्हा एकदा मालधक्का चौकातील होर्डिगं पडल्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसापासून बचावासाठी आडोशाला थांबलेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. किवळे येथील कात्रज-देहुरोड सर्व्हिस रस्त्यावरील टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये पाच जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बचाव पथकाने एका जणाला होर्डिगखालून सुखरुप बाहेर काढले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या घटनेची तातडीने माहिती मिळताच घटनस्थाळी पोलीस दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु असून रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दल देखील आले आहेत. सहा क्रेनच्या साह्याने हे होर्डिंग बाजुला केले जात असून या होर्डिंगखाली नेमके यात किती जण अडकले आहेत, याची नात्र अद्याप माहिती समोर आली नाही.
Big Breaking : दहशतवादी कृत्यांसाठी वापर : पुण्यातील शाळेवर ‘एनआयए’ची मोठी कारवाई – Letsupp
सहा क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे. बचाव पथकाने एका जणाला होर्डिगखालून सुखरुप बाहेर काढले. परंत, तो गंभीर जखमी असल्याने प्रकृती चिंताजनक आहे. तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी ढग दाटून आले. त्यातच सोसाट्याचा वारा सुटला. या वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले असल्याचे काही जणांनी सांगितले. या होर्डिंगच्या खाली थांबलेले काहीजण त्याखाली अडकून पडले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी झालेली आहे. बचावकार्यासाठी स्थानिकही मदतीसाठी सरसावले आहेत.