Download App

Pune Loksabha : पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडणं भोवलं! धंगेकरांवर गुन्हा दाखल…

पोलिस ठाण्यासमोर जमाव गोळा केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Pune Loksabha : राज्यात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात काही घटना वगळता शांततेत मतदान झाल्याचं दिसून आलं. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Loksabha) महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केलायं. धंगेकरांनी मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पोलिस ठाण्यासमोरच कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडला होता. या प्रकरणी धंगेकरांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलीयं.

PM Modi यांच्याकडून लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल; पाहा काही क्षणचित्रे…

पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे रिंगणात आहेत. मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात रात्रीच्यादरम्यान, पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने रविंद्र धंगेकर यांनी 12 मे रोजी रात्रीच्या सुमारास थेट पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांसमोर ठिय्या आंदोलन केलं. लोकं मतदारसंघात पैसे वाटत असून पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातंच आराम करत बसल्याचाही आरोप केला होता.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एका आरोपीला हरियाणातून अटक

ठिय्या आंदोलनादरम्यान, रविंद्र धंगेकरांची पोलिसांकडून समजूत काढण्यात आली. मात्र, धंगेकर पोलिसांचं एकही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर सहकार नगर पोलिसांकडून रविंद्र धंगेकर यांच्यावर जमाव गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या लाइव्ह कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल 13 मे रोजी पुण्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तिन्ही उमेदवारांकडून मागील काही दिवसांपासून मॅरेथॉन प्रचार करण्यात आल्याचं दिसून आलं. पुणे लोकसभा निवडणुकीत दुरंगी लढत होणार होती, मात्र, ऐनवेळी वंचितचे अध्यक्ष वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत चांगलाचं ट्विस्ट आला. वंचितकडून मोरे यांना उमेदवारी मिळाल्याने ही लढत तिरंगी होणार हे स्पष्ट झालं.

follow us