Pune Loksabha : भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर! उमेदवारच बदलण्याची मागणी; काकडेंचा नाराजीचा सूर

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता पुण्यात भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पुणे भाजपचे नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांना नाराजीचा सूर आवळला आहे. मी लोकसभेसाठी इच्छूक होतो पण मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आलीय, माझा त्यांना विरोध नाही पण रडल्याशिवाय आई बाळाला […]

Murlidhar Mohol Kakde

Murlidhar Mohol Kakde

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता पुण्यात भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पुणे भाजपचे नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांना नाराजीचा सूर आवळला आहे. मी लोकसभेसाठी इच्छूक होतो पण मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आलीय, माझा त्यांना विरोध नाही पण रडल्याशिवाय आई बाळाला जवळ घेत दूध देत नसल्याची तिखट प्रतिक्रिया देत काकडेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य अन् गिरिजा ओककडून नव्या नाटकाची घोषणा

संजय काकडे पुढे बोलताना म्हणाले, मी इच्छुक होतो हे जग जाहीर आहे. मी 100% नाराज आहे. मी नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका असं सांगितलं नाही. मुरलीधर मोहोळाचं नावं घोषित झालेले आहे पण AB फॉर्म दिलेला नाही. रवींद्र चव्हाण आणि माझी मैत्री आहे. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. मी आजही पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे, माझा मुरलीधर मोहळ यांना विरोध नसल्याचंही संजय काकडे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘विकासकामे सोडून अभिनयालाच महत्व द्यायचे’; अजितदादांनी कोल्हेंना धू-धू धुतलं!

पुणे लोकसभेसाठी मी जो सर्वे केला आहे, तो रवींद्र चव्हाण यांना सांगितला. मी 6 वर्ष खासदार होतो. मी या अगोदर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. पक्षाचं काम थांबवा असं मी कोणालाही सांगितलं नाही. रडल्याशिवाय आई देखील बाळाला जवळ घेत नाही. आणि दूध देत नाही, असंही ते म्हणाले आहेत. तसेच एकनाथ शिंदेची शिवसेना आमच्याबरोबर आहे, पण पुण्यात कोणती शिवसेना स्ट्रॉग आहे हे पूर्ण पुणे शहराला माहित आहे.

दरम्यान, महायु्तीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यातील भाजपाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेत नाराजी धूर करण्याचा प्रयत्न केला. माझ्या उमेदीच वय मी पक्ष्यासाठी दिला आहे. माझा पक्षाने विचार करावा असं देखील काकडे यांनी रवींद्र चव्हाण यांना सांगितलं आहे. देशामध्ये उमेदवारी जाहीर होऊन देखील स्थानिक परिस्थिती पाहता उमेदवार बदलले जातात. त्यामुळे AB फॉर्म पक्षाने देई पर्यंत मी इच्छुक असून त्यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवार बदलावा अशी मागणीच संजय काकडे यांनी केली आहे.

Exit mobile version