‘विकासकामे सोडून अभिनयालाच महत्व द्यायचे’; अजितदादांनी कोल्हेंना धू-धू धुतलं!

‘विकासकामे सोडून अभिनयालाच महत्व द्यायचे’; अजितदादांनी कोल्हेंना धू-धू धुतलं!

Ajit Pawar On Amol Kolhe : अमोल कोल्हे (Amol Kolhe) शिरुर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha) विकासकामे सोडून अभिनयालाच महत्व देत असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना धू-धू धुतलं आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाक प्रवेश केला. या प्रवेशानंतर अजित पवार यांनी भाषणातून अमोल कोल्हे यांच्या जुन्या गोष्टी काढत सडकून टीका केली आहे.

राम शिंदेंनी हट्टाने एमआयडीसीचा निर्णय करून घेतला : पण कर्जतमध्ये त्याविरुद्ध नाराजी

अजित पवार म्हणाले, आजही ही सभा अमोल नाही तर अनमोल आहे. शिरुरच्या जागेसाठी खूप प्रयत्न केले होते. 2019 साली लोकसभा निवडणुकीआधी मी अमोल कोल्हेंना बोलावून घेतलं. अमोल कोल्हे तेव्हा शिवसेनेत होते. तेव्हा मी कोल्हेंना म्हटलं तुम्हाला राष्ट्रवादीत यायचं ते नाही म्हणाले होते, पण मी त्यांना राष्ट्रवादीत घेऊन शिरुर मतदारसंघातून निवडून आणलं. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी चित्रपटाचं शुटींग, मालिकेचं शुटींग, आणि अभिनय करण्यालाच अधिक महत्व दिलं असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

आढळरावांचं ठरलं! आज अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश; ‘शिरुर’चा उमेदवारही ठरला

निवडून आल्यानंतर अमोल कोल्हे म्हणायेच, मी एक कलाकार, मालिकेत काम करतो, माझा राजकारणाचा संबंध नाही. दादा हे माझं काम नाही, असं अमोल कोल्हे यांनी मला उत्तर दिलं होतं. एवढचं नाहीतर कोरोना काळानंतर अमोल कोल्हे माझ्याकडे राजीनामा देण्यासाठी आले होते. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीसह शिरुर भागातील अनेक नेतेमंडळी नाराज होते. दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे इतर नेतेही तक्रार करायचे, हे बरोबर नसल्याचं लोकं म्हणायेच, मी अमोल कोल्हे यांना समजावलं तर मला जमत नसल्याचं प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिलं असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी मध्य साधल्याची भूमिका निभावल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केले असला तरी, देखील घड्याळ्याच्या हातात शिवबंध कायम राहणार असल्याचे आढळराव पाटलांनी स्पष्ट केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube