अमोल कोल्हेंच्या गाडीवर 16 हजार 900 रुपयांचा दंड प्रलंबित, वाहतुक पोलिसांकडून जशास तसं उत्तर

  • Written By: Published:
अमोल कोल्हेंच्या गाडीवर 16 हजार 900 रुपयांचा दंड प्रलंबित, वाहतुक पोलिसांकडून जशास तसं उत्तर

मुंबई : ट्रॅफिक सिग्नलवर पोलिसांकडून वसुली केल्याचा अनुभव अनेकांना आहे. मात्र, आज याचा खुद्द राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनाही आला. त्यानंतर त्यांनी वाहतुक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीची आकडेवारीच समोर आणली होती. प्रत्येक चौकाचौकात वाहतूक पोलिसांना (Traffic Police) वसुलीचे टार्गेट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली, असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. यावर आता वाहतूक पोलिसांनीही जशास तसं उत्तर दिलं. अमोल कोल्हे यांच्या गाडीवर 16 हजार 900 रुपयांचा दंड बाकी असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

COP28 Summit मध्ये पुन्हा भेटले पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी; पाहा फोटो… 

कोल्हे यांनी मुंबई पोलिस वाहन चालकांकडून पैस उकळत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला. त्यांनी पोलिसांच्या वसुलीची थेट आकडेवारीच समोर आणली. कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजार रुपयांची वसुली आणि 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं वाहतूक पोलिसांना टार्गेट देण्यात आल्याच कोल्हेंनी सांगितलं. त्याच ट्वीटला रीट्वीट करत कोल्हे यांच्या गाडीवर 16 हजार 900 रुपयांचा दंड असल्याचं वाहतुक पोलिसांनी सांगितलं.

MP Election Result : शिवराज मामा सिंहासन राखणार की सत्ताबदल होणार? जाणून घ्या ग्रहांची स्थिती काय 

मुंबई वाहतूक पोलिसांचे रिट्विट
महोदय, आम्ही आम्ही चौकशी केली असून आपले वाहन MH14FH – – – – 28 डिसेंबर 2019 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत, महाराष्ट्रातील विविध रस्त्यांवर 15 ई-चलानवरील ₹16900/- चा दंड प्रलंबित असल्यानेच आपले वाहन चालकास थकीत दंड भरण्याची विनंती करण्यात आली होती.

कोल्हेंचं नेमट ट्विट काय?

मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवाईवर खासदार कोल्हे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आजचा धक्कादायक अनुभव!… मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले. मी स्वत: काय प्रकार आहे, याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25 हजार रुपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई करावी.
मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/प्रतिदिन म्हणजे, फक्त एकट्या मुंबईत 1.63 कोटी रुपये आहे.. इतर शहरांचे काय?


संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठीच होतोय का, याची माहिती जनेला मिळेल… ट्रिपल इंजिन…. ट्रिपल वसुली, असा खोचक टोलाही कोल्हे यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube