पुणे : पुणे लोकसभेचे वारे भाजपमध्ये जोरात वाहू लागले असून, इच्छूकांनी आता बदलत्या समीकरणानुसार आपले डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पोटात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याही मर्जीत असलेले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनीही या इच्छूकांच्या स्पर्धेमध्ये हॅट फेकली असून, भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल यासाठीची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. (BJP Sanjay Kakade Also Ready For Pune Loksabha Election)
मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण; कायद्याचा मसुदा तयार : निवडणुकीपूर्वी CM शिंदे मोठा डाव जिंकणार?
राज्यसभेवर मेधा कुलकर्णी गेल्यामुळे इतर इच्छूकांच्या आशा उंचावल्या आहेत. काकडे यांच्यासह या उमेदवारीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हेदेखील इच्छूक आहेत. चौघांनीही विविध कार्यक्रम, मेळावे, गाठीभेठी याद्वारे आपला संपर्क काही महिनेआधी सुरू केला आहे.
कोंबडी चोर ते नेपाळी वॉचमनचं पोरं…; राणे अन् भास्कर जाधवांच्या वादाची वात कुठून पेटली
राज्यातील भाजपची राजकीय रणनीती ठरवण्यामध्ये काकडे आघाडीवर
काकडे समर्थकांच्या म्हणण्यानुसार संजय काकडे गेली 8 वर्ष राज्यातील भाजपची राजकीय रणनीती ठरवण्यामध्ये आघाडीवर होते. काकडेंनी पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. याशिवाय अनेक पक्षांमधील नगरसेवकांना भाजपमध्ये आणून मोठे बहुमत पक्षाला मिळवून देण्यामागे काकडेंचा सिंहाचा वाटा होता असेही समर्थकांचे मत आहे.
फडणवीस, अजितदादांच्या काकडे मर्जीतले
वरील बाबींशिवायदेखील काकडेंनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत केलेल्या राजकीय खेळींचा भाजपला फायदा झाला होता. पुणे कॉन्टेंमेंट, शिवाजीनगर या दोन प्रमुख मतदार संघांमध्ये त्यांनी ऐनवेळी काँग्रेसचे काही नेते भाजपकडे वळवले होते. त्यामुळे भाजपचे आमदार येथे निर्धोकपणे निवडून येऊ शकले. याशिवाय उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या काकडे (Sanjay Kakade) मर्जीतील असल्यामुळे त्यांना सहजपणे उमेदवारी मिळेल अशी आशा काकडेंच्या समर्थकांना वाटत आहे.
निवडणुकांच्या अभ्यासाबद्दलही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काकडेंबाबत कौतुकाचीच भावना आहे. त्यामुळे त्यांना जर योग्य संधी मिळाली तर, राज्यातील इतर जागा निवडून आणण्यामध्येसुद्धा काकडेंचा उपयोग होऊ शकेल. कारण 2019 मध्येदेखील महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघांची जबाबदारीदेखील काकडेंकडे देण्यात आलेली होती.
विधान परिषदेला विसरले, राज्यसभेला डावलले… हर्षवर्धन पाटलांवर आता थेट केंद्रात नवी जबाबदारी
काँग्रेस विरूद्ध भाजप होणार निवडणूक
पुणे शहरातील लोकसभेची निवडणूक ही काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच होणार आहे. त्यामुळे जर काकडे रिंगणात असतील तर, काँग्रेसमधील नाराज गट काकडेंच्या मदतीला येऊ शकतो असेही त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. 2014 मध्येदेखील राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांना गोळा करत निवडून जाण्याचा मोठा चमत्कार काकडेंनी केलेला होता. या चमत्काराचे स्मरण अनेकांना आहे. त्यामुळे जर पुण्यातून काकडेंना संधी मिळाल्यास काकडे आणखीन काहीतरी वेगळी राजकीय गणिते पुणे शहरासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत मांडतील असेही काकडेंच्या समर्थकांना वाटत आहे.
भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले होते. तो लीडदेखील आपण मोडून काढू शकू अशी खात्री संजय काकडे यांनी ‘लेट्सअप’ शी बोलताना याआधीच व्यक्त केलेली होती. त्यामुळे या निवडणुकीत काकडेंना संधी देऊन भाजप त्यांची लोकसभेवर जाण्याची इच्छा पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.