Pune Loksabha : माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर असल्याचा भलताच कॉन्फिडन्स महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतांचं विभाजन होणार का? असा सवाल धंगेकरांना करण्यात आला. त्यावर बोलताना धंगेकरांनी पुणेकर मलाच निवडून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
विकासकामं करणं म्हणजे अॅक्टिंग करण्यासारखं नाही; आढळरावांनी कोल्हेंना डिवचले
रविंद्र धंगेकर म्हणाले, लोकशाहीत संविधानाने अधिकार दिले आहेत. कोणी कुठेही निवडणूक लढवू शकतो. वसंत मोरे माझे मित्र आहेत. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. मी पुणेकर, मी धंगेकर पुणेकरांसाठी मत मागत आहे. जनता सुज्ञ आहे. मतांची टक्केवारी ही कमी होत चालली आहे त्याचा अर्थ जनता सुज्ञ होत चालली आहे आणि इंडिया आघाडीमागे उभी राहील. काँग्रेसमध्ये अनेक समाजाची मते आहेत ती मते धंगेकरांना मिळतील. कुठल्याही जातीधर्माच्या चौकटीत मी अडलेला नाही. ब्राम्हण ते दलित ओबीसी, ओपन, समाजाशी माझे संबंध आहेत त्याचा मला फायदा होईल. मतांचं विभाजन होणार नाही, माझी ही दहावी निवडणूक असून माझा विश्वास विभाजनावर नाही पुणेकरांवर असल्याचं रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात किरण सामंतांची विकेट? राणेंनी दावा ठोकताच निवडणुकीतून घेतली माघार
तसेच मी पुणेकरांचा कार्यकर्ता ते मला निवडून देतील. माझे कार्यकर्ते सज्ज आहेत, प्रचार जोरदार सुरु आहे. माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून माझे कार्यकर्ते मित्र रस्त्यावर उतरले आहेत, कसबा पॅटर्नवरुन मी पुणे शहरात 30 वर्षांपासून काम करतोयं. माझ्या झोपडीला दारच नाही, लेखक म्हणतात या झोपडीत माझ्या नाही दार दोऱ्या. माझ्या झोपडीला दार अन् दोरीही नाही. कोणीही कधीही येऊ शकतो. माझ्यासारखा कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी पुणेकर निवडून देतील, असंही धंगेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरविले आहे. दोघांनी आता प्रचार सुरू केला आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते काँग्रेसकडून लोकसभा लढण्यास इच्छूक होते. परंतु मोरेंना काँग्रेसमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते काही दिवसांपूर्वीच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना भेटले होते. तेव्हापासून वसंत मोरे हे वंचितकडून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा होती. आता वंचितने त्यांची उमेदवारीच घोषित केली. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.