Download App

Pune Loksabha : तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? सुनील देवधरांनी पुण्यात शड्डू ठोकला !

  • Written By: Last Updated:

Pune Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यात आता सर्वच पक्षातील नेते लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पुणे लोकसभा लढण्यासाठी (Pune Loksabha) भाजपमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहेत. या जागेवर संघासाठी काम केलेले व भाजपचे नेते सुनील देवधर (Sunil Devdhar) यांनी दावा सांगितला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पुण्याच्या जागेवर त्यांनी थेट भूमिकाच जाहीर केली आहे.

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत सुनील देवधर म्हणाले, या जागेसाठी मला कुणाचाही ग्रीन सिग्नल नाही. मला कुणाचा यॅलोही सिग्नल नाही आणि मला कुणाचाही रेड सिग्नलही नाही. कुठलाही खासदार असं छातीठोकपणे नाही सांगू शकत नाही. मी इकडचा पुन्हा खासदार बनणार आहे. तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? पक्षाने संधी दिली तर पुण्याचा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे. मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी. त्यांनी घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, यासाठी पक्षाचे काम करणे, यासाठी पुण्याची मी निवड केली आहे.

Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्का! लोकसभेला उमेदवारी न दिल्याने कट्टर समर्थक मातोश्रीवर

मुळात भारतीय जनता पक्षामध्ये सिग्नल नावाची पद्धतच नाही. आज भारतीय जनता पक्षातील काही मोठे नेते सोडले तर मी त्यात नाही.तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना. मुख्यमंत्री कसे बदलले आहेत. एकदम नवीन चेहरे कसे समोर आले. त्याच्यामुळे असं मीच सोडा. दुसरे कुणी सांगत सुटत असेल ना माझे तिकीट नक्की आहे. तर तोही लोकांना मूर्ख बनवत आहे, असेही देवधर म्हणाले.

Nitish Kumar : मी नाराज नाही! अखेर नितीश कुमारांचा यूटर्न…

पुण्यातून निवडणूक लढण्याच्या भूमिकेबाबत देवधर म्हणाले, राजकारणात जनतेमधून निवडून येण्याची इच्छा असणे ही चुकीचे नाही. तेच योग्य आहे. तेच खरे जनतेचे राजकारण आहे. बाकीचे राजकारण करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहे. भाजपमध्ये पक्ष संघटनेचे राजकारण आहे. आयुष्यभर ज्यांनी जीवन वेचले. त्यात जगन्नाथराव जोशी होते. ते पुण्यातून निवडून लढले होते. वसंतराव भागवत हेही होते. राजकारण खरं कोणतं तर ते जनतेमधलं आहे. बाकीच्या गोष्टी सपोर्ट करणाऱ्या असतात. पहिल्यापासून जनतेत राहण्याची मला आवड आहे. मी त्रिपुरामध्ये जनतेत राहिलो आहे. मी माझ्या पुण्यात जनतेमध्ये राहून का काम करू नये. मी माझे काम सुरू केले आहे.

लोकसभेसाठी मी इच्छूक आहे म्हणून मी पक्षाला सांगितले आहे. पक्षाने संधी दिली तर पुण्याचा खासदार म्हणून मला प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. किंवा ज्याला पक्ष संधी देईल. त्याला पूर्ण ताकदीने निवडून देणे माझी जबाबदारी आहे. ते माझे कर्तव्यच असल्याचे देवधरांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ नेत्यांकडे इच्छा व्यक्त करण्याचा पूर्वीचा जमाना होता. त्यांच्याकडे जावून बोलावे लागत होते. आता तुमचा सोशल मीडिया बोलतो आणि सोशल मीडियावरही त्यांचे लक्ष असते. सोशल मीडियाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आग्रही आहेत. सगळ्यांनी त्यांच्या योजना, अॅक्टिव्हिटी हे सगळे सोशल मीडियावर टाका. सोशल मीडियाला कनेक्ट व्हा, असे तेच सांगतात. सोशल मीडिया हे खुले पुस्तक आहे. सोशल मीडियावर मी कुठेच म्हणत नाही उमेदवार द्या.पण इच्छा तर आहे. ताकाला जावून भांडे मी लपवत नाही, असे स्पष्ट भूमिकाही उमेदवारीबाबत देवधरांनी मांडली आहे.

मी पुण्याचाच, आताही स्कूटीवर फिरतो

मी पहिल्यापासून जमिनीवर आहे. मी बाहेर राहिलो आहेत. परंतु त्यांना माझी बॅकग्राउंड माहीत नाही. ते अज्ञानाने माझ्याबाबत बोलू शकतात. मी कोथरुडमध्ये मुलांचे वसतिगृह सुरू केले. तेव्हा वर्षभर मी स्कूटीवर सगळे पुणे फिरलो आहे. सायकलवर फिरलो आहे. आणि पुण्यात आल्यानंतर बाईकवर फिरतो आहे. पुण्यात आल्यावर आताही तसाच फिरतो आहे. वर्षभरापूर्वी पुण्यात काकाची एमटी घ्यायचो आणि फिरायचो.त्यावेळेस पक्षाला सांगितले असतं राष्ट्रीय सचिव म्हणून गाडी पाठवा. त्यांनी आनंदाने गाडी पाठविली असती. मी प्रोटोकॉल पाळतो. सामान्यांसारखा राहतो. मला पॅराशूट नेता वगैरे म्हणत असतील.कदाचित विरोधी पक्षांना भिती वाटत असेल. ते तसा नॅरेटिव्ह पसरू शकतात, असा आरोपही देवधर यांनी केला आहे.

Tags

follow us