Download App

मॅट्रिमोनियल साईट अन् वधू-वर सूचक मंडळांमार्फत लव जिहाद; पुण्यात भाजप नेत्याकडून पोलखोल

Love Jihad पुण्यामध्ये भाजप माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरेंनी पत्रकार परिषद घेत लव जिहादची पोलखोल केली.

Pune Love Jihad BJP leader Disclosure : पुण्यामध्ये सिंहगड रस्ता परिसरात एका महिलेची पतीचा मित्राकडूनच फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच अनेक ठिकाणी मॅट्रिमोनियल साईट अन् वधू-वर सूचक मंडळांमार्फत लव जिहादसारखे प्रकार घडत आहेत. यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अशा प्रकारांचा पोलखोल केली आहे.

VIDEO : मला बिर्याणी अन् चिकन फ्राय हवंय, चिमुकलीच्या विनंतीवर सरकार करतंय अंगणवाडीतील मेनूमध्ये बदल

यावेळी त्यांनी सिंहगड रस्ता परिसरातील एका ३२-वर्षीय महिलेच्या बाबतीत नुकत्याच घडलेल्या मारहाणीच्या, फसवणुकीच्या तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आणली. पतीचा मित्र असलेल्या संबंधित व्यक्तीने पतीच्या निर्णयानंतर संबंधित महिलेच्या पतीच्या निधनानंतर मिळालेल्या भविष्यनिर्वाह निधीतील तसेच सोन्याचे दागिने असे एकूण 32 लाखाहून अधिक रक्कम एका मुस्लिम पुरुषाने व त्याच्या कुटुंबियांनी हडपल्याचे निदर्शनास आले.

करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेचा विश्वास संपादन करून तसेच जवळीक साधून ‘लव्ह जिहाद’चा प्रयत्न केल्याचा महिलेचा आरोप आहे. मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “या घटनेतील आरोपी अकबर बहादूर शेखने संबंधित महिलेच्या मनात सहानुभूती निर्माण करत तिच्याशी जवळीक वाढवली. जेव्हा संबंधित महिलेला या आरोपीच्या अन्य प्रकरणांची माहिती समाजली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. आरोपीकडून फसवणू‌क झलेल्या अन्य महिलांनीसु‌द्धा पुढे यावे असे आम्ही आवाहन करत आहोत.

नगरकरांची डोकेदुखी वाढली! जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव, सिव्हिल सर्जन म्हणाले…

या स्त्रियांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात तसेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करून फसवणूक करणाऱ्या परधर्मीय पुरुषांना धडा शिकवावा, असे आवाहन भाजपाच्या माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी देणार जागा अन् ‘इतके’ रुपये

पुणे शहर व जिल्ह्यातील 50 हून अधिक महिलांना लव्ह जिहादच्या जाळ्यात खेचले गेल्याच्या तक्रारी गेल्या वर्षभरात आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक महिला भीतीपोटी तसेच समाजात बदनामी होईल. या कारणास्तव तक्रार देण्यासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा याबाबत कोणाशीही संवाद साधत नाहीत. त्यामुळे लव्ह जिहादच्या अनेक घटनांची नोंद होऊ शकत नाही. असे आमच्या निदर्शनास आले आहे.

Video : अंजलीताई ‘बदनामियांनी’ अनेकांना बदनाम केलं, आता त्यांच्या एपिसोडमध्ये मी; मुंडेंचा पलटवार

अनेक मॅट्रिमोनियल साईट तसेच वधू-वर सूचक मंडळांच्या सूचीमध्ये नोंदणी केलेल्या परधर्मीय पुरुषांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेत खोटी माहिती सादर केल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा संस्था तसेच प्लॅटफार्म चालविणाऱ्या कंपन्यांनी परधर्मीय पुरुष-महिलांचे प्रोफाईल व त्यातील माहितीची पडताळणी योग्य पद्धतीने करावी. अन्यथा त्यांनाही लव्ह जिहादच्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी आम्ही करू. दिपक नागपुरे यांनी म्हटले आहे.

follow us