Magarpatta City Silver Jubilee Year : शेतकर्यांनी एकत्र येऊन टाऊनशीप उभारणी आणि बांधकाम क्षेत्रात विकासाच्या सहकाराचे उदाहरण जगासमोर मांडणाऱ्या मगरपट्टा सिटीच्या रौप्यमहोत्सवाला (Magarpatta City) रविवारी (दि. 3) उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी मगरपट्टासिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी कोणत्याही शहराच्या विकास हा लोकांच्या सहभागातून, समन्वयातूनच होतो, याचे सर्वोत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे मगरपट्टा सिटी शहर असल्याचे सांगितले. कोणत्याही शहराचा विकास हा लोकांच्या सहभागातून, समन्वयातूनच होतो, याचे सर्वोत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे मगरपट्टा सिटी शहर असल्याचे सतीश मगर म्हणाले.
Exclusive : कारखानदारी, राजकारणाची वाट सोडून मगरपट्ट्याचं साम्रज्य उभं करणारे सतीश मगर
आपल्या सर्वांच्या वाड- वडीलांनी मेहनतीने कमवलेल्या, टिकवलेल्या जमिनीवर देशाच्या इतिहासात गौरवाने ओळखली जाईल अशा प्रकारे सामूहिक विकासाची संकल्पना आपणा सर्वांचा विश्वास व ग्राहक बळावर यशस्वी झाली आहे. 1999 साली 130 पेक्षा अधिक शेतकर्यांनी एकत्र येऊन फार्मर्स डायरेक्ट इनव्हेस्टमेंट (एफडीआय) सामूहिक विकासाची ही एक नवी संकल्पना जगासमोर मांडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Exclusive : ‘तो’ शब्द खटकला अन् सतीश मगर यांनी मगरपट्टा सिटी निर्माण केली
ही यशस्वी संकल्पना आजही प्रगती पथावर असून, हा प्रवास असाच पुढे सुरू राहो असा विश्वास सतीश मगर यांनी यावेळी व्यक्त केला.
कोणत्याही शहराचा विकास हा लोकांच्या सहभागातून, समन्वयातूनच होतो, याचे सर्वोत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे मगरपट्टा सिटी शहर असल्याचे सतीश मगर म्हणाले. हा लोक सहभाग व समन्वय लोकांनी आयोजित उत्सवातून प्रकट होतो तो सामूहिक उत्सव बनतो. जसा आज आपण साजरा करतो आहोत.
रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त मगरपट्टासिटीमधील 20 हजारांहून अधिक नागरिक, मगरपट्टासिटीमधील सहभागी भागधारक मगरपट्टासिटीचे संचालक मंडळ आदींनी एकत्र येत मशाल रॅली, दीपोत्सव व भव्य आतषबाजीचे आयोजन केले होते. मशाल रॅलीमधून प्रज्वलित झालेली ज्योत मगरपट्टा सिटी ग्रुपच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात वर्षभर तेवत ठेवली जाणार आहे. तसेच वर्षभर प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम आयोजन केले जाणार आहे.