Exclusive : परखड अजितदादांचा राग रोहित पवारांच्या सासऱ्यांनाही सहन करावा लागला होता; जाणून घ्या किस्सा …

Exclusive : परखड अजितदादांचा राग रोहित पवारांच्या सासऱ्यांनाही सहन करावा लागला होता; जाणून घ्या किस्सा …

Magarpatta City owner Satish Magar on Ajit Pawar : पुण्यातील मगरपट्टा सिटी या लक्झरिअस टाऊनशिपचं पवार कुटुंबाचं जवळचं कनेक्शन आहे. हे कनेक्शन म्हणजे सतीश मगर हे पुण्यातील मगरपट्टा सिटी या टाऊनशिपचे संस्थापक आहेत. त्यांच्या कन्या कुंती यांचा विवाह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू त्याचबरोबर कर्जत जामखेड या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याशी झालेला आहे. त्यामुळे सतीश मगर रोहित पवार यांचे सासरे आणि रोहित पवार हे मगरपट्टा सिटीचे जावई आहेत.

मात्र याच रोहीत पवारांच्या सासऱ्यांच्या सासऱ्यांच्या मगरपट्ट्यातील ट्राफिकवर राष्ट्रवादीचे नेते आणि रोहीत पवार यांचे काका अजित पवार संतापले होते. याचा किस्सा स्वतः सतिश मगर यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला. काय आहे हा किस्सा? पाहुयात…

मगरपट्ट्याला लागून असलेल्या रस्त्यावर अहमदनगर आणि सोलापूर या ठिकाणी येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड ट्राफिक जामची समस्या निर्माण होते. मात्र आम्ही ज्यावेळी मगरपट्टा सिटी निर्माण केलं. त्यावेळी आम्ही हा रस्ता 30 ते 45 मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावेळी आम्ही रस्ता मोठा करून रस्त्याच्या शेजारी दुकान निर्माण करून ट्राफिक वाढेल. असं तत्कालीन सत्ताधाऱ्यांना वाटलं. तर या ट्राफिकवरून अजित पवार नेहमीच नाव ठेवतात की, मगरपट्टा सरकता छोटा करण्यात आला. मात्र हा रस्ता आम्ही छोटा केला नाही. तशीच परवानगी शासनाकडून मिळाली असं स्पष्टीकरण यावेळी सतिश मगर यांनी अजित पवारांना दिलं.

मगरपट्ट्याला लागून असलेल्या रस्त्यावर निर्माण होणाऱ्या ट्रॅफिक जामला आम्ही जबाबदार नाही. तसेच ट्रॅफिक जाम ही समस्या परदेशात देखील आहे. लंडनसारख्या शहरात देखील तुम्हाला एअरपोर्टवर जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे यावरती पर्याय एकच आहे की, आपल्याकडे चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्ट असणे गरजेचे आहे. असा सल्ला देखील मगर यांनी दिला.

लेट्सअप मराठीने ‘लेट्सअप बिझिनेस महाराजा’ हे मुलाखत सूत्र सुरू केले आहे. यामध्ये नामांकित उद्योगपती, उद्योजक बांधकाम व्यावसायिक यांच्या जीवनाविषयीची फिलॉसॉफी, त्यांचं व्यवसायातील यश, त्या मागचे कष्ट प्रयत्न आणि विशेष म्हणजे जी नवी पिढी अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये उतरू इच्छित आहे. त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या युक्त्या अशा सर्व गोष्टी या मुलाखत सत्रामध्ये जाणून घेतल्या जाणार आहेत. दरम्यान या मुलाखत सत्राची सुरुवात पुण्यातील मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांच्या मुलाखतीने करण्यात आली. यावेळी त्यांनी आपले अथक परिश्रम खडतर्फ प्रवासाने मिळालेले यश त्याचबरोबर विविध विषयांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube