Download App

गरिब खासदार-आमदारांना गिफ्ट! म्हाडाच्या सोडतीत 113 घरं राखीव

Pune MHADA lottery ची खासियत म्हणजे यामध्ये गरीब खासदार-आमदारांसाठी घरं राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे म्हाडाची ही सोडत चर्चेत आली आहे.

  • Written By: Last Updated:

Pune MHADA lottery flat reserved for Poor MP and MLA : गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळाने म्हणजे म्हाडाने पुण्यामध्ये सोडत जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवर आणि पीएमआरडीएचा समावेश आहे. तसेच या सोडतीची खासियत म्हणजे यामध्ये गरीब खासदार-आमदारांसाठी घरं राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे म्हाडाची ही सोडत चर्चेत आली आहे.

म्हाडाच्या पुणे कार्यालयात सोडतीचा शुभारंभ

म्हाडाने जाहीर केलेल्या या सोडतीमध्ये 6 हजार 168 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या पुणे कार्यालयात या सोडतीचा शुभारंभ करण्यात आला आहे. म्हाडाच्या पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार

या योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 ही आहे. तर अर्जांची प्रारूप यादी 11 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 13 नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत असेल. त्यानंतर 17 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी सोडत काढली जाणार आहे. यावेळी या योजनेसाठी अर्जदारांना आता त्यांच्या जोडीदारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डिजी लॉकवरून घेणे बंधनकारक असणार आहे.

आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो! मोदी शाहंच्या फोटोखाली वादग्रस्त मजकूर, प्रकरण काय?

दरम्यान या सोडतीची खासियत म्हणजे यामध्ये गरीब आजी-माजी खासदार-आमदारांसाठी घरं राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे म्हाडाची ही सोडत चर्चेत आली आहे. यामध्ये 113 घरं या गरीब आजी-माजी खासदार-आमदारांसाठी घरं राखीव ठेवण्यात आली आहेत.

 

follow us