Municipal Corporation Notice To Dinanath Mangeshkar Hospital : पुणे (Pune) महापालिकाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital) मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही थकबाकी भरणे आवश्यक होतं. दोन दिवसांत 22 कोटीची थकबाकी न भरल्यास पुढील कारवाई करावी, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर जप्तीचे कारवाई करण्याचे महापालिकाचे (Pune Municipal Corporation) तोंडी आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिका दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळतंय.
Video : मोदींनाही वाटतं होतं केदार जाधवनं भाजपात यावं; पक्षप्रवेशावेळी बावनकुळेंनी काय सांगितलं?
पुणे महापालिकेचा मिळकत कर थकवणे दीनानाथ रुग्णालयाला महागात पडलंय. रुग्णालय धर्मादाय आहे, असं कारण देत प्रशासन कोर्टात गेलं. तरी देखील पालिकेचा कर थकवल्याप्रकरणी मिळकत कर विभाग रुग्णालयाला कर भरण्यासाठी नोटीस धाडली आहे. रुग्णालयाने तब्ब्ल 22 कोटी रुपये थकवल्याचे पुढे आलंय. याबाबत आज रूग्णालयाला नोटीस पाठवली आहे.
पुणे येथे सात महिन्यांची गर्भवती महिला तनिषा भिसे हिचा मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने उपचार नाकारल्यानंतर, कुटुंबाकडे तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण, बाळंतपणानंतर तनिषाची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. तनिषाच्या पतीने मंगेशकर रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
रेती धोरण ते सिंधी विस्थापितांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय
या घटनेनंतर नागरिकांत मोठं संतापाचं वातावरण होतं. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. तर या सर्व प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी असल्याचं राज्य सरकारने नेमलेल्या समितीने स्पष्ट केलंय. रूग्णालयाने पैशांची अटकळ केल्यानं गर्भवती महिलेचा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला अन् तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर उपचार सुरू असतानाच सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषाचा मृत्यू झाला. तर डॉ. घैसास यांनी राजीनामा झाल्याचं समोर आलंय.