ज्येष्ठ नगरसेवक गणेश बीडकर भाजपच्या गटनेतेपदी; पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला

Ganesh Bidkar-पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले आहे. भाजपचे सर्वाधिक 119 नगरसेवक विजयी झाले आहेत.

GANESH BIDKAR

GANESH BIDKAR

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) भाजपच्या (BJP) गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख राहिलेले गणेश मधुकर बीडकर (Ganesh Bidkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुणे शहरप्रमुख धीरज घाटे यांना तसे पत्र दिले आहे.

पुण्यावर दुसऱ्यांदा शोककळा; माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले आहे. भाजपचे सर्वाधिक 119 नगरसेवक विजयी झाले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक गणेश बीडकर हे भाजपचे निवडणूक प्रमुख होते. आता त्यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. ते शहरातील ज्येष्ठ नगरसेवक व भारतीय जनता पार्टीमधील शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते 2002 पासून महानगरपालिकेत निवडून येतात. भाजपासाठी प्रतिकूल मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसच्या गटनेत्यास व पुण्याच्या तत्कालीन महापौरांना पराभूत केले होते. पूर्व पुण्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका त्यांची आहे. गेल्या ३० वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रिय असून, प्रभाग पातळीपासून शहर पातळीपर्यंत विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. (Pune Municipal Corporation Senior corporator Ganesh Bidkar appointed as BJP group leader)

भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘जनादेश यात्रा’ची प्रमुख जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. गणेश बीडकर यांचे वडील स्वर्गीय मधुकरराव बीडकर हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष होते.


भूषविलेली महत्त्वाची पदे

2009-2010 अध्यक्ष, कसबा पेठ प्रभाग समिती

2010 –2011 : अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

2011 – 2012 : अध्यक्ष, स्थायी समिती

2014 – 2017 : गटनेता, भारतीय जनता पार्टी

2020-2022 : सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Exit mobile version