गणेश बीडकरांनी विकासकामांची यादीच ठेवली समोर; पुण्यात तब्बल 50 कोटींची विकासकामे सुरू
पुण्यातील भाजप नेते गणेश बिडकर यांच्याशी महापालिका निवडणुकीवर चर्चा केली असता, त्यांनी भाजपची तयारी आणि शहराचं प्लॅनिंग सांगितलं.
Development works worth Rs 50 crores begin in Pune : राज्यात मनपा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. निवडणूक आयोगानं नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीला लागले आहेत. यानिमित्ताने पुण्यातील भाजप नेते तथा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर(Ganesh Bidkar) यांच्याशी महापालिका निवडणुकीवर चर्चा केली असता, त्यांनी भाजपची(BJP) तयारी आणि शहराचं प्लॅनिंग सांगितलं. यावेळी बोलताना त्यांना पुण्यातील भाजप-शिवसेना(BJP-Shivsena) युतीविषयी विचारलं असता, आमच्या पक्षातील वरिष्ठ यावर निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. भाजपमध्ये नेतृत्वविरोधात बोलण्याची प्रथा नाही, माझ्या नेत्याला माझ्यापेक्षा जास्त समजतं. अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या विकासाच्या बाबतीत खूप तत्पर आहेत. हे शहर दिवसेंदिवस वाढतंय, शहराच्या विकासाला चालना मुख्यमंत्री या शहराला आठवड्यातून एक दिवस वेळ देतात. पुण्यावर त्यांचं विशेष लक्ष आहे. मात्र पुण्यावर असणारं मुख्यमंत्र्यांचं लक्ष पाहता ते पुण्यातून निवडणूक लढवतात कि काय अशी चर्चा सुरू असतानाच. या चर्चेला गणेश बिडकर यांनी फुल स्टॉप दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं ज्याप्रमाणे पुण्यावर लक्ष आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्रात प्रत्येक शहर आणि गावाला ते वेळ देत असतात. त्यामुळे ते येथून निवडणूक लढवतील असं वाटत नाही. शहरातील विकासकामांविषयी बोलताना त्यांनी शहरात तब्बल 50 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचं सांगितलं. शहरात दररोज 10 लाख लोकं येत-जात असतात. प्रशासन येथे राहणाऱ्या लोकांचा विचार करून पाण्याचं वाटप करतं, याचा देखील विचार केला पाहिजे. फ्लोटिंग लोकसंख्येचा विचार केला जात नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या एका लाईनची घोषणा केली, जर हा रास्ता झाला तर पुणे शहर मुंबईला कनेक्ट होईल आणि शहराची ग्रोथ वाढेल. त्याचप्रमाणे नवीन डीसीपी आणि 5 पोलीस स्टेशन नव्यानं मिळणार पुणे हे एकमेव आणि पाहिलं शहर असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला उल्लेख देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केला. शहरातील विकासकामांबद्दल बोलताना पुढे गणेश बिडकर म्हणाले की, शहरात सुरू असलेली विकासकामे महापालिकेकडून नाही, तर केंद्र सरकार आणि राज्याच्या निधीतून सुरू आहेत. मागील 10 वर्षांत कधी पीएमपीएल बंद पडली नाही, जी अगोदरच्या काळात रोज 1 बंद पडल्याची बातमी येत होती. त्याच क्रेडिट तरी आम्हाला द्या. शहरात पावसाळ्यात जे पाणी साचत, ते पावसाच्या बदलत्या पटरमुळे साचत, त्यावर देखील आमचं काम सुरू असून आम्हाला थोडा वेळ द्या त्या समस्या देखील दिसणार नाहीत. त्या पॅटर्ननुसार शहराला बदलायला वेळ लागेल.
Video : विवाह ते विवादापर्यंतच्या समस्यांवर भाजप खासदाराने सांगितला ‘राम’बाण उपाय
ज्याप्रमाणे आम्ही मेट्रोचं काम केलं त्याप्रमाणे आम्हाला वेळा द्या ही कामं देखील होतील. नद्यांची स्वच्छता देखील सुरू असून रिव्हर फ्रंट हा शहराचा चेहरामोहरा बदलणारा प्रकल्प आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठ्यावरही यावेळी गणेश बिडकर यांनी भाष्य केलं. शहरात नव्याने 60 पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून 27 टाक्यांचं काम सुरू असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. पुणे शहरातील विकासकामांची यादी वाचायला लागलो तर मला 1 तासांचा वेळ लागेल, अशा शब्दांत त्यांनी विकासकामांची माहिती दिली. त्याचप्रमाणे पुणेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तसेच कॉग्रेसच्या कलमाडींची संस्कृती आहे मी हे केलं ते केलं सांगण्याची, तस भाजपमध्ये नाही. याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांची कधी तुलना होऊ शकत नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
