Manjusha Nagpure : पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात डिजिटल कारवाईची मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ नावाची वेबसाईट देखील सुरु केली आहे. या वेबसाईटवर नागरिकांना शहरातील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो अपलोड करता येणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन दिवसांत तब्बल 764 नागरिकांनी अनधिकृत फ्लेक्सचे फोटो अपलोड केले आहेत.
महापालिकेने शहरातील फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच ‘भाऊ फ्लेक्स काढा’ हे पोर्टल सुरू केले. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अधिकृत वेबसाईटवर 24 नोव्हेंबर 2026 रोजी या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ‘ब्रँड्स’ आणि ‘माननीय’ अशा दोन स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये माननीय म्हणजे या श्रेणीमध्ये पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचं नावं आहे.
तर दुसरीकडे या मोहिमेअंतर्गत पुणे महापालिकेच्या अधिकृत एक्स अकॉउंटवरुन पुण्याच्या विद्यमान महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांना मिश्किल टोला लावण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
ड्रेनेजची तसदी समजू शकतो. फ्लेक्सची तसदी कशाबद्दल?
#pmc #pune #Encrochment #action @navalMH @prajytnair https://t.co/7oOb2G1Eui
— PMC Care (@PMCPune) November 25, 2026
पुणे महापालिकेच्या अधिकृत एक्स अकॉउंटवर महापौर मंजुषा नागपुरे यांचा फोटो असलेला फ्लेक्स पोस्ट करण्यात आला असून ड्रेनेजची तसदी समजू शकतो. फ्लेक्सची तसदी कशाबद्दल? असे मिश्किल कॅप्शन देण्यात आले आहे. पुणे महापालिकेने महापौर मंजुषा नागपुरे यांचा फोटो असलेला फ्लेक्स पोस्ट करत त्यांना मिश्किल टोला लावला असल्याची चर्चा आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता महापौर मंजुषा नागपुरे काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
परवानगीशिवाय लावलेले होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स किंवा पोस्टर्सची तक्रार दाखल करण्यासाठी : bhauflexkadha.pmc.gov.in
