ब्रेकिंग : पुणे महापालिका तातडीने रिकामी करा; महापौर कार्यालय उडवून देण्याच्या धमकीने खळबळ

Bomb Threat पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ

  • Ninad K
  • Written By: Published:
Letsupp Image   2026 06 10T114831.941

Bomb Threat To PMC Office : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत असून, महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. यानंतर मोठी खळबळ उडाली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांना कार्यलयातून तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेमका हा मेल कुणी केला? याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मुख्य इमारत रिकामी करण्यात आली असून बॉम्ब शोधक पथकाकडून शोधकार्य चालू आहे.  शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर मुख्य इमारतीचे कामकाज चालू करण्यात येणार आहे.

 

पोलिसांकडून तपास सुरू 

मिळालेल्या ई-मेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच RSS मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग सतर्क झाला असून, ई-मेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, तो खरा आहे की बनावट, याची तपासणी यंत्रणांकडून केली जात आहे.

सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षेच्या कराणास्तव सर्व कर्मचाऱ्यांना इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आल्याने मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

 

follow us