Download App

नियमबाह्य काम न केल्याने निलंबन; मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित अधिकाऱ्याचा मंत्र्यांबाबत गौप्यस्फोट

CM Shinde पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गौप्यस्फोट केला.

Pune Municipal Corporations Officer Wrote Letter to CM Shinde : पुणे महानगरपालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी आपल्या निलंबनाबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एक गौप्यस्फोट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नियमबाह्य काम न केल्याने आपल्यावर मंत्र्यांकडून निलंबनाची कारवाई केली गेली आहे.

रणनिती की माघार? बिहारच्या निवडणकीत ‘काँग्रेस’चं राजकारण ‘आरजेडी’च्या हातात…

हे गंभीर आरोप करताना मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये पवार म्हणाले की, नियमबाह्य टेंडर काढण्यासाठी मला मंत्र्यांकडून कात्रजमधील ऑफिसला बोलावले जायचे. दबाव टाकला जायचा परंतु मी तसं करण्यास नाकार दिला आणि याच कारणामुळे माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली. तसेच मी त्या विरोधात मॅडमध्ये दावा दाखल केल्यानंतर माझा मानसिक छळही करण्यात आला.

Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारताचा ठसा; चित्रपट, लघुपट अन् अभिनेत्रीनेही पटकावला पुरस्कार

पुणे आरोग्य अधिकारी प्रमुख पद रिक्त करण्यासाठी माझ्याविरुद्ध खोट्या तक्रार संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तसेच चौकशी न करताच महापालिकेकडून माझ्यावर कुठलेही चुकीचे शेरे नसतानाही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही कारवाई मी एक मागासवर्गीय अधिकारी असल्याने हेतू पुरस्कार मला त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला.

follow us