Download App

Pune News : धक्कादायक! ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

Pune News : पुणे शहरातील ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन (Pune News) कोटींचे ड्रग्ज पकडण्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एक खळबळजनक घटना घडली. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीच ही घटना आहे. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला आहे. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ललित पाटील याला एक्स रे काढण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांना (Pune Police) चकवा देत तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. आता येथे पोलीस बंदोबस्त असताना तो पळून गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला जात असून एकूणच रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

धक्कादायक! पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या गेटवरच पकडले 2 कोटींचे ड्रग्ज

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ललित पाटील याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये तो उपचार घेत होता. मात्र, येथे उपचार घेत असतानाही तो काही जणांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांन रुग्णालयाच्याच परिसरातून दोघा जणांना ताब्यातही घेतले होते. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते.

दरम्यान, पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या परिसरातून दोन कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक राज्यातील विविध ठिकाणांहून येत असतात. त्यामुळे दवाखान्यात कायमच वर्दळ असते. अशा परिस्थितीत दवाखान्याची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. मात्र, याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. आता तर दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर कोट्यावधींचे ड्रग्ज सापडते म्हटल्यानंतर प्रकरण गंभीर आहे. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा समावेश

Tags

follow us