Pune News : जामीन मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल

Pune News : एका गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून (Pune News) देतो. पण त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करून लाच मागणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वकिलाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभागाने गुन्हा दाखल केला. […]

Cash

Cash

Pune News : एका गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून (Pune News) देतो. पण त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करून लाच मागणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वकिलाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभागाने गुन्हा दाखल केला. आता नागरिक ज्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा करतात त्याच वकिलांकडून अशी फसवणूक करुन लाच मागण्याचे प्रकार घडत असल्याचे यातून दिसून येत आहे.

वकिलाने लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पुढे मात्र 17 डिसेंबर रोजी तक्रारदाराचे निधन झाले. त्यामुळे सापळा रचून कारवाई करता आली नाही. परंतु, विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागितली गेली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विभागाने या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Pune News : भाडोत्री खोली देणाऱ्या जागामालकांच्या खिशाला झटका; मनपाचा करवाढीचा प्रस्ताव रेडी

तक्रार देणारे तक्रारदार 70 वर्षांचे होते. त्यांच्या मुलाला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या वकिलाने तुमच्या मुलाला लवकरात लवकर जामीन मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी तपासी अधिकाऱ्याला 25 हजार रुपये द्यावे लागतील असे त्याने सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर विभागाने 9 डिसेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता वकिलाने तपासी अधिकाऱ्याला 20 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराकडे पंचांसमक्ष वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. या पडताळणीत तपासी अधिकाऱ्याचा सहभाग मात्र आढळून आला नाही.

यानंतर 17 डिसेंबर रोजी तक्रारदार यांचे निधन झाले त्यामुळे सापळा रचून पुढील कारवाई करता आली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर पोलीस ठाण्यात लाच मागणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले  

Exit mobile version