Ajit Pawar Speech in Pune : ‘निवेदक आपल्या निवेदनात दोन दादा म्हणाल्या. दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांतदादांना अजूनही आमचे पुणेकर कोल्हापूरचे दादा समजतात ते पुण्याचे वाटतच नाहीत. ही काय अडचण आहे कळतच नाही यात देवेंद्रजी तुम्ही लक्ष घाला. तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच घालत नाही असा टोला अजित पवार यांनी लगावताच सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर फडणवीसांनी लगेचच तुम्ही त्यांना पालकमंत्री होऊ दिलं नाही म्हणून.. असे उत्तर दिले. हजरजबाबी अजित पवार लागलीच म्हणाले ‘माझ्या आधी ते पालकमंत्री होते. आता आमचं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुला पुण्याचा पालकमंत्री करणार म्हणून मी आलो’, असे प्रत्युत्तर अजितदादांनी देताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सगळेच खळखळून हसले. निमित्त होते पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्काराचे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार राजयकीय फटकेबाजी केली. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली. त्यांच्या या टोल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही नेत्यांची ही राजकीय जुगलबंदी एक ते दोन मिनिटे चांगलीच रंगली होती.
देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व.. संजय राऊतांची गडकरींसाठी खास पोस्ट
गडकरी यांच्या कामकाजाचं कौतुक करताना अजित पवार म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या विचारांवर चालणाऱ्या नितीन गडकरींना हा पुरस्कार देण्यात येतोय हे अतिशय योग्य आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला. गडकरी साहेब फक्त यशस्वी राजकारणी नाहीत तर एक प्रयोगशील शेतकरी सुद्धा आहेत. दूरदृष्टी असलेले उद्योजक सुद्धा आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विकासाभिमुख नेते आहेत. अनेकदा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळते.
सातत्याने विविध प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्यांच्या कार्यशैलीत नेहमीच ठामपणा असतो. ठाम विचार आणि कृती देखील असते. धडाकेबाज निर्णय घेणारे आणि त्या निर्णयाला कृतीत उतरवणारे नेते आहेत. त्यामुळेच देशातील महामार्ग कामाचा आलेख इतक्या ठळकपणे आपल्याला दिसतो. यामुळेच गडकरी साहेब देशात आणि जनतेत लोकप्रिय आहेत. आता देशात त्यांनी गडकरी नाही तर रोडकरी म्हणून ओळखलं जातं. गमतीचा भाग सोडा पण त्यांच्या कार्यकाळात देशात रस्त्यांचं जाळं उभं राहिलं आहे.
गडकरी साहेबांच्या नेतृत्वाचा एक गुण मी अतिशय जवळून अनुभवला आहे. त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणावर लक्ष केंद्रीत केले. कोरोना संकटाच्या काळात आम्ही हा अनुभव घेतला. गडकरींनी कोणताही अभिनिवेष न बाळगता महाराष्ट्रासाठी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन तत्परतेने मदत केली. नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री झाल्यापासून सर्वाधिक फायदा आपल्या महाराष्ट्राला झाला आहे. अनेक राज्यमार्गांचं त्यांनी राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून घेतले. राज्याच्या विधिमंडळात आम्ही अनेक वर्षे एकत्रित काम केलं आहे.
तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं,.. नितीन गडकरींनी दिला मोठा इशारा…