Download App

प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती स्थिर पण..,; सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संपूर्ण घटना सांगितली

पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी सुर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संपूर्ण घटनाच माध्यमांसमोर सांगितलीयं.

Dinanath Mangeshkar Hospital Death Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar)रुग्णालयाच्या कारभाराविरोधात आज विविध संघटनांनी जोरदार निदर्शने केल्याचं दिसून आलं. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक सुशांक भिसे यांच्या पत्नीवर पैशांअभावी उपचार केले नसल्याचा आरोप भिसे कुटुंबियांकडून करण्यात आलायं. या प्रकरणानंतर सुर्या हॉस्पिटलमध्ये प्रसूती यशस्वी झाल्यानंतर गर्भवती महिलेचा मृत्यू झालायं. दीनानाथ रुग्णालयाच्या समितीकडून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आलायं. या अहवालानंतर सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संपूर्ण घटना टीव्ही9 शी बोलताना स्पष्ट केलीयं.

फसवणूक झालेला मी नाहीच! ऑनलाईन फसवणुकीनंतर वैतागलेल्या सागर कारंडेची टाळाटाळ

माध्यमांशी बोलताना डॉक्टर म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचार नाकारण्यात आल्यानंतर संबंधित रुग्णावरर सुर्या रुग्णालयात उपचार केले. आमच्या रुग्णालयात महिलेची प्रसूती पार पडली. या गर्भवती महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती स्थिर होती मात्र नंतर अचानक बिघडल्याने आम्ही उपचार सुरु केले. त्यानंतर कार्डियाक रुग्णालयात आम्ही रुग्णाला पाठवले असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

तसेच आमच्याकडे रुग्णाला दाखल करण्यात आलं तेव्हा रुग्णावर आम्ही हवे ते उपचार केले मदत केली. बालकांना एनआयसीयूमध्येही दाखल करुन उपचार दिले आहेत. गर्भवती महिलेला कॅन्सर होता की नाही याबाबत आम्ही काही बोलू शकत नाही. जे बोलत आहेत त्यावर आम्ही बोलू शकत नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

वक्फ विधेयकावरील मतदानावेळी राष्ट्रवादीच्या दोन खासदारांची दांडी; नेमकं कारण काय?

समितीचा अहवाल काय सांगतो?
तनिषा भिसे या 2020 पासून रूग्णालयामध्ये वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या. त्यांनी 2022 मध्ये 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया केली होती. 2023 साली त्यांना रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण अन् प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो की, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही. त्याची या रुग्णालयास माहिती नाही. मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत, असं देखील रूग्णालयाने स्पष्ट केलंय.

follow us