Download App

शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारणार शिवछत्रपतींचे सुवर्णमंदिर, जगातील सर्वात मोठा पुतळा

Pune News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनधारी सुवर्ण मंदिरही उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली. आळेफाटा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जुन्नर तालुका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनवणे यांनी केलेल्या या घोषणेमुळे शिवभक्तांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुन्नर शहरातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोद्रे गावामध्ये २५ एकर क्षेत्रावर सुवर्णमंदिर उभारण्यात येणार आहे. याच परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच २०० फुट उंच पुतळा उभारण्यात येणार असून ८० मीटर उंच स्वराज्याचा भगवा ध्वज देखील असणार आहे. यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे.

MP Election 2023 : मध्य प्रदेश कुणाचं? सर्व्हेतून ‘या’ पक्षाला मिळाली गुडन्यूज !

सुरुवातीला ही संकल्पना आपली स्वतःची असल्याने इतर कोणावरही आर्थिकभार न टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे “श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट” (रजि – पुणे/0000/317/2023) ची स्थापना करण्यात आली आहे. पुतळ्यासह शिवकालीन इतिहास जागवणारे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असून संपूर्ण उभारणी आणि देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

जुन्नर तालुका आणि परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शरद सोनवणे यांच्या संकल्पातून सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हे हॉस्पिटल सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असणार असून माफक दरात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यापुढे सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध करून सर्व पेशंटचा जीव वाचवणार, असा देखील निर्धार सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Contract Recruitment : …म्हणून कंत्राटी तहसीलदार नेमणार; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Tags

follow us