Download App

Hinjawadi Accident : जीव वाचवण्यासाठी धडपड अन् एकावर एक चौघांच्या बॉडी; भयावह अपघातातील मृतांची ओळख पटली

पुण्यातून आज सकाळीच एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली.

Hinjewadi Accident : पुण्यातून आज सकाळीच एक धक्कादायक आणि काळजाचा (Hinjewadi Accident) थरकाप उडवणारी घटना घडली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने अख्ख्या वाहनाचा ताबा घेतला. समोरच्या बाजूचे कर्मचारी कसेतरी बाहेर पडले. पण आतील कर्मचाऱ्यांचे दुर्दैवच आडवे आले म्हणा, त्यांनी काही केल्या बाहेर पडता आलं नाही. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. समोरील दृश्य, जीव वाचवण्यासाठीची धडपड, वाहनाचा जळून झालेा कोळसा अन् भाजलेले कर्मचारी पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं.

दरम्यान, या अपघातातील मृत कर्मचाऱ्यांची ओळख पटली आहे. या भीषण दुर्घटनेत सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण ( वय ४०) (सर्व मृत राहणार पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कर्मचाऱ्यांचा मृत्यू चटका लावणाराच आहे. पण, या वाहनाला आग लागली तरी कशी? या टेम्पो ट्रॅव्हलरचे मेंटेनन्स झाले नव्हते का असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोरी आणि टेम्पो चालक जनार्दन हंबारडीकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

धक्कादायक! पुण्यात टेम्पोला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू; अनेक जण जखमी

व्योमा ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी सकाळी ऑफिसला निघाले होते. टेम्पो ट्रॅव्हलरमधून 12 प्रवासी प्रवास करत होते. टेम्पो हिंजवडी फेज वनमध्ये असतानाच चालकाच्या पायाखाली आग लागली. नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी चालक आणि समोरील कर्मचारी पटकन खाली उतरले. पण मागचे दार उघडले गेले नाही. तोपर्यंत आग फोफावली आणि अख्ख्या वाहनालाच कवेत घेतले. या आगीत वाहनाच्या आतील चार कर्मचारी होरपळून मृत्यूमुखी पडले.

या अपघाताचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोतून प्रसंगाची दाहकता स्पष्ट दिसत आहे. आगीत जळून खाक झालेले वाहन आणि त्यात एकावर एक पडलेले मृतदेह स्पष्ट दिसत आहेत. आग लागण्या पर्यंत परिस्थिती निर्माण होते तरी देखील वाहनाच्या दुरुस्तीकजे लक्ष दिले जात नाही की यामागे काही वेगळेच कारण आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कंटनेर चालक जागीच ठार 

दरम्यान, पुण्यातील हिंजवडी परिसर अत्यंत गजबजलेला आहे. या भागात अनेक आयटी आणि इतर कंपन्या आहेत. त्यामुळे दररोज हजारो लोक आणि वाहनांची या भागातून ये जा सुरू असते. कंपनीत जाणारे बहुतांश कर्मचारी खासगी वाहनांतून प्रवास करतात. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता या वाहनांसाठी नियमावली तयार करण्याचा विचार केला जाणार आहे.

follow us