धक्कादायक! पुण्यात टेम्पोला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू; अनेक जण जखमी

धक्कादायक! पुण्यात टेम्पोला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू; अनेक जण जखमी

Hinjewadi Fire Accident News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पोला भीषण आग लागली. यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. टेम्पोलो आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चौघेही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमधून प्रवास करत होते. यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने चार जणांना होरपळून मृत्यू झाला. यातील जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालकावर उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

अपघात कसा झाला याची माहिती समोर येत आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे टेम्पोत आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच समोरच्या भागात बसलेले कर्मचारी लगेच बाहेर पडले. परंतु, चार जण मात्र होरपळून मृत्यूमुखी पडले. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. या जखमी कर्मचाऱ्यांना हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई-अमरावती रेल्वेचा मोठा अपघात; ट्रकने जोरदार धडक दिल्याने घडली घटना

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणता आली. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. त्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होऊनही ही दुर्घटना घडली की आणखी काही कारण होते याची माहिती तपासातूनच समोर येणार आहे. सध्या या दुर्घटनेतील जखमी कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी कर्मचाऱ्यांत टेम्पो चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube