Download App

Video : पुण्यात श्रीमंत बापाच्या पोराचा भररस्त्यात ‘नंगानाच’; पहिले लघूशंका केली अन् मग…

पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात एका चालकाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune News : पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात एका चालकाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुण आणि त्याच्या मित्राने दारु प्यायली होती. यानंतर अश्लील वर्तन करण्यात आले. विशेष म्हणजे महिला दिनीच पुण्यासारख्या शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अश्लील वर्तन करणारा तरुण कोण होता. त्याच्याबरोबर दुसरा तरुण कोण होता? याचा उलगडा अजून झालेला नाही. या तरुणाकडे बीएमडब्ल्यू कार होती. त्यामुळे हा एखाद्या श्रीमंत बापाचा मुलगा असावा असा अंदाज बांधला जात आहे.

नेमका काय प्रकार घडला

शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद चालकाला लघुशंका करताना अडवण्यात आले. पण नंतर गाडीत बसल्यावर या तरुणाने अत्यंत अश्लील हावभाव केले. तसेच नंतर गाडी सुरू करून भरधाव वेगात निघूनही गेला. सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने वेगवान गतीने गाडी चालवत होते. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. या प्रकारामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. या गोष्टीची जाणीव असतानाही तरुण अगदी बेफिकीर दिसत होता.

मुलांना सांभाळा, रस्त्यावर धांगड धिंगा चालणार नाही; पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना भरला सज्जाड दम

या प्रकारामुळे शहरातील महिलांची सुरक्षा आणि सदर चालकांच्या अश्लील वर्तनावर चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कडक कायदा करावा आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केला आहे. यामुळे तपास करण्यात पोलिसांना अडचणी येणार नाहीत.

मुलांना सांभाळा धांगडधिंगा चालणार नाही

मागील काही दिवसांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला गालबोट लागल्याचं दिसत आहे. आता अलीकडे पुण्यात (Pune News) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास रस्त्यावर येवून धांगडधिंगा करत वाढदिवस साजरा केला जाण्याची नवीन पद्धत सुरू (Amitesh Kumar Warning) झालीय. एखाद्याचा वाढदिवस असेल तर रात्री बारा वाजता टोळके मोठ्या प्रमाणावर फटाके फोडतात. मोठमोठे साऊंड लावून धिंगाणा करत वाढदिवस साजरा केला जातोय. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार मात्र अॅक्टिव्ह मोडमध्ये असल्याचं दिसत आहे. त्यांनी हा इशारा दिला आहे.

Video : शेवटच्या माहितीवरून आरोपीला पकडलं; कुणी दिली माहिती? पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

follow us