Video : शेवटच्या माहितीवरून आरोपीला पकडलं; कुणी दिली माहिती? पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

Pune Police Press on Swargate Rape Case : पुण्यातील सवारगेट बस स्थानकाच्या परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाला. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. (Pune Police ) तरूणीवर अत्याचार करणाा आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताल मध्यरात्री अटक केली आहे. यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते बोलत होते.
मला पश्चाताप होतोय चूक झालीय, सरेंडर करायचं स्वारगेटच्या नराधमाच्या अटकेचा सिनेस्टाईल थरार..
आरोपीच्या गावकऱ्यांशी आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. आरोपी ज्यावेळी त्याच्या गावी गेला होता त्यावेळी त्याचा जीवाला काही धोका आहे का ? किंवा कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हे आमचं पहिलं काम होत ते आम्ही केलं आहे असं अमितेश कुमार म्हणाले आहेत. या तपासात आरोपी विरोधात पुरा तयार करून कारवाई करणं हे आमचं काम आहे असंही अमितेशकुमार म्हणाले आहेत. बाकी काही सांगता येणार नाही. कारण तपास पूर्ण व्हायचा आहे.
शेवटच्या माहितीवरून आम्ही आरोपीला पकडलं. शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणालातरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत”, असं अमितेश कुमार म्हणाले.