मुलांना सांभाळा, रस्त्यावर धांगड धिंगा चालणार नाही; पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना भरला सज्जाड दम

Pune Police Commissioner Warning Birthdays Celebrations On Streets : मागील काही दिवसांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला गालबोट लागल्याचं दिसत आहे. आता अलीकडे पुण्यात (Pune News) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास रस्त्यावर येवून धांगडधिंगा करत वाढदिवस साजरा केला जाण्याची नवीन पद्धत सुरू (Amitesh Kumar Warning) झालीय. एखाद्याचा वाढदिवस असेल तर रात्री बारा वाजता टोळके मोठ्या प्रमाणावर फटाके फोडतात. मोठमोठे साऊंड लावून धिंगाणा करत वाढदिवस साजरा केला जातोय.
‘संभाजी महाराजांसारखा छळ, कारकुनाचा छळ कोणी करीत नाही’, राणे-परबांमध्ये तू-तू मैं-मैं…
नुकतंच पिंपरी- चिंचवड शहरात एका पोलीस शिपायाने देखील वाजत गाजत वाढदिवसांचं जंगी सेलीब्रेशन केल्याचं समोर ( Birthdays Celebrations On Streets) आलंय. या पोलिसाच्या वाढदिवसाला चार गुन्हेगार सुद्धा उपस्थित होते, अशी माहिती मिळतेय. तर ड्रोन कॅमेऱ्यात या पोलीस शिपायाच्या वाढदिवसाचं शूटिंग केल्याची देखील माहिती मिळतेय. या घटनांमुळे पुणे जिल्हा चांगलाच चर्चेत आहे.
यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार मात्र अॅक्टिव्ह मोडमध्ये असल्याचं दिसत आहे. कोंढवा पोलीस ठाणे आणि मरकजी बैतूल माल फाऊंडेशनच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, रस्त्यावर धांगड धिंगाणा करत वाढदिवस साजरा करणं आता अजिबातच चालणार नाहीये. जर कोणी लपून छपून असा वाढदिवस साजरा करत असेल तर ठीक आहे. परंतु जेव्हा ती व्यक्ती पकडली जाईल, तेव्हा तिच्या कुटुंबियांनाच जबाबदारी घ्यावी लागेल, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आहेत.
टॉयलेट साफ करायचो, गाड्या अन् लाद्या पुसायचो…लक्ष्मण उतेकरांचा संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास
शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलीस कसून प्रयत्न करत आहेत. कोयता गॅंग, खून, बलात्कार या घटनांमुळे शहरात मोठं दहशतीचं वातावरण आहे. आपल्या मुलांवर नियंत्रण लावण्याची जबाबदारी आई वडिलांची आहे. जर मुलं आई वडिलांचं ऐकत नसतील, तर आमची मदत घ्या. आम्ही त्यांचं मन परिवर्तन करू, ती पद्धत आम्हाला येते. तसंच नागरिकांनी जबाबदारी घेतली, तर रस्त्यावर कोणताही दादा जन्माला येणार नाही, असं देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलेलं आहे.