CP Amitesh Kumar : पुण्यात हेल्मेट सक्ती होणार? नवीन आयुक्तांनी दिले संकेत
CP Amitesh Kumar : दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे (Helmets Compulsory) कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सर्वप्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सांगितले.
पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट घालणे कायद्याने आवश्यक आहे. मात्र शहरातील काही संघटनांनी वाहतूक कोंडी आणि संथ वाहतूकीचे कारण देत हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. अशा परिस्थितीत हेल्मेटबाबत जनजागृती व्हायला हवी. त्यानंतर हेल्मेट सक्तीचे करा, असे आवाहन केले होते.
गुंडांची परेड का घेतली? CP अमितेश कुमार यांनी खरं सांगून टाकलं…
शहरातील वाहतूक कोंडी आणि हेल्मेटच्या अनिवार्य वापराबाबत अमितेश कुमार म्हणाले, बाईकस्वारांना हेल्मेट घालणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. संबंधित घटकांशी चर्चा करून हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी दूर करण्यास प्राधान्य
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘शहरात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. दररोज नागरिकांना दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी दहा ते बारा मोठे चौक आणि रस्ते (हॉटस्पॉट) निश्चित करण्यात आले आहेत.
सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुखांची क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती
पालिका आणि संबंधित यंत्रणांशी चर्चा करून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. मात्र त्यासाठी संबंधित यंत्रणांशी बोलणी सुरू झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात गणेशखिंड रोड, आनंदऋषीजी महाराज चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर, औंध, बाणेर, पाषाण, स्वारगेट, कात्रज-कोंढवा रोड, खडी मशीन चौक, वाघोली, नगर रोड यासह नवले पूल आणि काही चौक निश्चित करण्यात आले आहेत.
अपात्र आमदार प्रकरणाचा EC च्या निर्णयाशी संबंध नाही; राहुल नार्वेकरांचं मोठं विधान