अपात्र आमदार प्रकरणाचा EC च्या निर्णयाशी संबंध नाही; राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

अपात्र आमदार प्रकरणाचा EC च्या निर्णयाशी संबंध नाही; राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

NCP Disqalification Mla : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी मेरिटनूसारच निकाल देणार असून या निकालाचा निवडणूक आयोगाशी कुठलाही संबंध जोडला जाणार नसल्याचं मोठं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलं आहे. दरम्यान, नूकताच निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असून घड्याळ चिन्हही देण्यात आलं आहे. आता आमदार अपात्र प्रकरणावर राहुल नार्वेकरांनी मोठं विधान केलं आहे.

Pratap Dhakane : अजितदादा स्वार्थी पण पवारांचं काही अडत नाही, म्हणत ढाकणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रतेचा निर्णय मेरीटनूसारच देणार असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नसल्याचंही नार्वेकरांनी यावेळी सांगितलं आहे.

काँग्रेसचीच गॅरंटी नाही अन् माझ्या गॅरंटीवर प्रश्न..,; PM मोदींची जहरी टीका

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. एक शरद पवार आणि दुसरा अजित पवार गट. त्यानंतर अजित पवार गटाने सत्तेत सामिल होण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्षावरही अजित पवार गटाकडून दावा सांगण्यात आला होता. निवडणूक आयोगासमोर सुनावणीदरम्यान,अजित पवार आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने बहुमताचा आकडा लक्षात घेत अजित पवार यांचीच राष्ट्रवादी असून घड्याळ चिन्हही बहाल केलं. त्यानंतर शरद पवार गटाला मोठा धक्काच बसला.

आम्हीही मराठीच, पक्ष पळवण्याचा प्रश्नच नाही; अजितदादांचं सुळेंना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर येत्या 14 फेब्रुवारीला निकाल देणार असल्याची शक्यता आहे. मागील महिन्यात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ते काय निकाल देतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर सर्व आमदारांची उलटतपासणी पार पडली आहे. आता 14 फेब्रुवारी रोजी राहुल नार्वेकर एतिहासाकि निकाल देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. शिवसेना निकालाहून वेगळा निर्णय लागण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज