गुंडांची परेड का घेतली? CP अमितेश कुमार यांनी खरं सांगून टाकलं…
Pune news : दोन दिवसांपासून गँगस्टर्स (Pune crime) आज अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेले गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने त्यांना बोलावण्यात आले होते. सोशल मीडिया, मोबाईल आणि त्यांच्या माहिती अपडेट करण्यात येत आहे. गुन्हेगारी आणि उदात्तीकरण करणे तसेच खंडणीच्या प्रकारावर कठोर कारवाई केली जाईल, अशी समज देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सांगितले.
NDPS हा प्राधान्याचा मुद्दा असेल. फायर आर्मचे रॅकेट आणि त्यांचे लिंकेज तपासले जात आहेत. आज सुमारे दीडशे गुन्हेगारांना बोलावण्यात आले तसेच राजकीय पाठबळावरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. जुने गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्यांना पोलिसांचे सहकार्य मिळणार आहे. मात्र जे गुन्हे करत असतील तर त्यांना आम्ही कायद्याचा दणका दाखवू, असे त्यांनी सांगितले.
काही भागात अवैध धंदे अनेकदा समोर येतात. याबाबत अमितेशकुमार म्हणाले, पुणे शहराचे पोलिस दल पूर्वीपासूनच सक्षम आहे. याबाबत कोणाला शंका घेण्याची गरज नाही.
अपात्र आमदार प्रकरणाचा EC च्या निर्णयाशी संबंध नाही; राहुल नार्वेकरांचं मोठं विधान
अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे असे अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. पब वेळेवर बंद होतील. कोयता गँग रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांविरुद्ध मोहीम उघडली जाणार आहे. शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन अर्ज सादर केला आहे. तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गुन्हेगारांच्या कारवायांवर बारीक नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट तयार करण्यात येणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या झोपडपट्टी पोलिसिंगवर भर राहणार आहे. पोलीस ठाणे व चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परेडमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बळ मिळणार आहे. परवाना जप्त करून आस्थापना कायमची बंद केली जाईल. हुक्का पार्लरमध्ये हर्बल हुक्क्याला परवानगी आहे. मात्र, त्यांच्या नावाने इतर लोक हुक्का चालवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुखांची क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती