Pune News : पुण्यात स्कूल व्हॅनचालकाने (Pune News) तीन ते चार मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीयं. पुण्यातील एका शाळेतील मुलींना व्हॅनमधून ने-आण करण्याची जबाबदारी या व्हॅनचालकाची असून व्हॅनचालकाने मुलींशी गैरवर्तन केल्याचं समोर आलंय. यासंदर्भात मुलींच्या पालकांनी व्हॅनचालकाने गैरप्रकार केल्याचे व्हिडिओ काढले आहेत. या प्रकरणी पतितपावन संघटनेने आक्रमक पवित्रा घेत व्हॅनचालकाला बेदम चोप दिला असून नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मनसेसोबतच्या युतीसाठी बायकोला विचारलं का? मनोमिलनाआधीच राणेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली
व्हॅनचालक आपल्याशी गैरवर्तन करत असल्याची माहिती मुलींनी घरी सांगितली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी व्हॅनचालक आम्हाला मारहाण करेल या भीतीमुळे मुलींनी घरी सांगण्याची हिंमत केली नाही. हा प्रकार वाढतच असल्याने मुलींनी घरी पालकांना सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आलंय. या व्हॅनचालकाने पाच ते सहा मुलींसोबत अशा पद्धतीने गैरवर्तन केलं असून या प्रकरणी पतितपावन संघटनेच्या पदाथिकाऱ्यांनी व्हॅनचालकाला चांगलाच चोप दिला आहे.
चोप दिल्यानंतर पतितपावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हॅनचालकाला नांदेड सिटी पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. व्हॅनचालक मुलींची गैरवर्तन करत असल्याचे प्रकार पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले, त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी त्याला चोप दिला आहे. शाळेतील लहान मुलींनी चॉकलेटचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत असल्याचं निदर्शनास आलंय. मुलींना निर्जनस्थळी नेऊन तासनतास गाडी थांबवणे यांसदर्भातील व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केले आहेत., त्यानंतर आम्ही त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलंय. पुढील काळात असं कोणी कृत्य केल्यास सोडणार नसल्याचा इशारा पतितपावन संघटनेकडून देण्यात आलायं.