Pune News : 2 हजारांसाठी आई-वडिलांनी पोटच्या मुलीला भीक मागण्यासाठी विकलं…

Pune News : पैशांसाठी मुलीला विकण्याचे अनेक प्रकार समोर आलेले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. आई-वडिलांनी दोन हजार रुपयांसाठी पोटच्या मुलीला भीक मागण्यासाठी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आई-वडिलांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा अन् हुंड्यासाठी वाद; जवानाकडून गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या लेकीची गळा दाबून […]

Ahmednagar News :

Ahmednagar News

Pune News : पैशांसाठी मुलीला विकण्याचे अनेक प्रकार समोर आलेले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. आई-वडिलांनी दोन हजार रुपयांसाठी पोटच्या मुलीला भीक मागण्यासाठी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आई-वडिलांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगा अन् हुंड्यासाठी वाद; जवानाकडून गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या लेकीची गळा दाबून हत्या

नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी अ‍ॅड. शुभम लोखंडे यांच्या फिर्यादीनूसार आई-वडिलांनी पोटच्या मुलीला चार वर्षीय मुलीला दोन हजार रुपयांमध्ये विकलं आहे. या चार वर्षीय मुलीला विकण्यासाठी संबंधित समाजाच्या 10 पंचांची सहमती घेतली होती. त्यानंतर मुलीला येरवडा परिसरातून बारामतीतील सुपा येथे जबरदस्तीने घेऊन भीक लावण्यात आली आहे.

Sanjay Raut : राहुल नार्वेकरांनी कायदा अन् घटनेशी द्रोह केला; आमदार अपात्रतेवरून राऊतांचा घणाघात

या प्रकरणाची पोलखोल झाल्यानंतर आपण मुलीला दत्तक घेतल्याचा दावा मुलीचा ताबा घेतलेल्या दाम्पत्याकडून करण्यात आला आहे, दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

बोगस पिक विमा धारकांना कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा दणका, पडताळणी करुनच पैसे देणार

फक्त दोन हजार रुपयासाठी आपल्या पोटच्या चार वर्षाच्या लेकीला भीक मागण्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने येरवडा परिसरातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं असून अ‍ॅड. शुभम शंकर लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version