Download App

Pune News : ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’; पुण्यातही मराठा समाज रस्त्यावर

Pune News : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या मागणीसाठी पुण्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात पुण्यातल मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत मराठा समाजाने आंदोलन केलं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांचीही उपस्थिती होती.

सनातन धर्म समाजासाठी ‘HIV’ सारखा : स्टॅलिन यांच्यापाठोपाठ द्रमुकच्या आणखी एका नेत्याचे विधान

पुण्यातील हडपसर परिसरात झालेल्या या आंदोलनात संपूर्ण मराठा रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळालं आहे. राज्यातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतील ओबीसी आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं, तसेच जालना आंतरवली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनालाही पाठिंबा देण्यात आला आहे.

2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं…

यावेळी बोलताना चेतन तुपे म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. लाठीहल्ल्याची चीड महाराष्ट्राला आहे ती व्यक्त होतेयं,. मराठा समाज सदन नाही, त्यामुळे आरक्षणाची मागणी होते, जालन्यात आंदोलक महिलाना मारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं असून यावर सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी चेतन तुपे यांनी केली आहे.

दरम्यान, जालन्यात झालेला लाठीहल्ला इंग्रज काळात होत होता, याआधी सरकारने आरक्षण दिलं होतं, सरकार लोकांच्या सोबत पाहिजे, मराठा समाजाच्या आग्रही मागणीचा निर्णय घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.,

Tags

follow us