Download App

VIDEO : पुण्यात चाललंय काय? थारचालकाने दुचाकीची लाईनच उडवली; सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील कोथरुड परिसरात एका थारचालकाने दारुच्या नशेत दुचाकीची संपूर्ण लाईनच उडवून टाकल्याची घटना घडलीयं.

Pune News : पुण्यात काय घडेल हे काही सांगता येत नाही. पोर्शे अपघात (Porsche Car Accident) प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा एका थारचालकाने (Thar Accident) एका रेस्टॉरंटसमोर लागलेली दुचाकीची लाईनच उडवली असल्याची घटना घडलीयं. ही घटना पुण्यातील युफोरिया कोथरुड परिसरात घडलीयं. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं समजतंय. या प्रकरणी विश्वेष देशपांडे यांच्या फिर्यादीवरुन थारचालकावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील युरोफिया कोथरुड परिसरात रात्रीच्या वेळी लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. रात्री 8 : 25 वाजता गार्डन कोर्ट हॉटेलचा मालक ऋषी पुजारी मद्यपान करत चारचाकी चालवत होता. याचवेळी गाडीचा अंदाज न आल्याने पुजारीने दारुच्या नशेर पाच ते सहा दुचाकींना जोराची धडक देत उडवल्या आहेत. या गाडीच्या संपूर्ण काचा काळ्या रंगाच्या असून तुम्ही पुन्हा दुसरं पोर्शे अपघात होण्याची वाट पाहत आहात काय? असा सवाल स्वरदा बापट यांनी केलायं.

प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड निधन; वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

युफोरिया मॉलच्या बाहेर असलेल्या गार्डन कोर्ट हॉटेलच्या समोर लहान मुलं खेळण्यासाठी येतात. शनिवारी रात्री ८.२५ च्या सुमारास, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ऋषी पुजारी यांनी त्यांच्या वाहनाने पाच ते सहा दुचाकींना धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली असून, काही दुचाकींचे नुकसान झाले आहे. ऋषी पुजारी हे गार्डन कोर्ट हॉटेलचे मालक असून, त्यांच्या वाहनाच्या काचा काळ्या केल्या आहेत. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

“होय, पाकिस्तान खोटारडाच”, भारताने केला पर्दाफाश; पाकिस्तानच्या ‘त्या’ 5 गोष्टी खोट्याच..

पोर्शे अपघाताची आठवण :
या घटनेनंतर पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणाची आठवण झाली. कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघातात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांचा बळी घेतला होता. त्याचप्रमाणे काल घडलेली घटना आहे. त्यामुळे यावर देखील कठोर कारवाई केली जावी, अशी केली जात आहे.

follow us